परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार न्याय

Mumbai
Railway Board Exam

मुंबई:-मुंबई आणि पुण्यात क्षुल्लक कारणावरून रेल्वे भरतीच्या परीक्षेतून डावलण्याची घटना समोर आली होती. यासंबंधीचे वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’ने सर्वप्रथम १८ सप्टेंबर रोजी ‘रेल्वेची परीक्षा रुळावरून घसरली’ या मथळ्याखाली प्रकाशित केले होते. त्यानंतर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली स्थानीय लोकाधिकार समितीने मुंबई सेंट्रल येथे रेल्वे बोर्डाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर आता रेल्वे बोर्डानी त्या विद्यार्थींच्या पुनर्परीक्षा घेण्याचे ठरवले आहे.रेल्वे भरती बोर्डाने विविध ९५ हजार पदांच्या जागेसाठी देशभरात परीक्षा घेण्यात सुरुवात केली असून यात ग्रुप ‘डी’ची परीक्षा अजूनही चालू आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. रेल्वे भरती प्रक्रियेतील ऑनलाईन परीक्षेत रेल्वेने मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी शेकडो मराठी उमेदवारांना क्षुल्लक कारणावरून परीक्षेपासून वंचित ठेवले.

यासंबंधीचे वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’ने वृत्त प्रकशित करून ही बाब रेल्वेच्या आणि विविध पक्षातील लोकांच्याही लक्षात आणून दिली होती. त्यानंतर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली स्थानीय लोकाधिकार समितीने मुंबई सेंट्रल येथे रेल्वे बोर्डाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. रेल्वेने ज्या मराठी मुलांना परीक्षेला बसू दिले नाही, त्यांची परीक्षा लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणीही शिवसैनिकांनी तेव्हा केली होती. त्यावर रेल्वे भरती बोर्डाने सकारात्मकता दाखवत परीक्षेपासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. अशा विद्यार्थ्यांनी रेल्वे भर्ती बोर्डाकडे संपर्क करावा, असे आवाहन रेल्वे बोर्डाकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी यांनी दैनिक महानगरचे आभार मानले आहेत. तसेच रेल्वे बोर्डाचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना हॉलतिकीट काढता आले नव्हते, अशा विदयार्थ्यांनासुद्धा रेल्वे बोर्डाने एसएमएस पाठवून त्यावेळी प्रवेश दिला होता असे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

काय होते प्रकरण ?

रेल्वेची ही परीक्षा मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा शहरांमध्ये सुरू आहे. ही परीक्षा खासगी कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने विविध सत्रांमध्ये घेण्यात येते. परीक्षेला येताना छायाचित्र असलेले कोणतेही सरकारी ओळखपत्र सोबत बाळगावे, अशी सूचना रेल्वेच्या जाहिरात आणि प्रवेशपत्रावर दिली होती. परंतु परीक्षार्थींनी आधार कार्ड दाखवल्यावरही ते आधार कार्ड डुप्लिकेट असल्याचे सांगत पुणे आणि मुंबईच्या परीक्षा केंद्रांवर मराठी उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आले होते. त्यानंतर परीक्षार्थींनी पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स दाखवल्यावर त्यातही त्रुटी काढून परीक्षेपासून वंचित ठेवले. सोबतच रेल्वे भरती बोर्डाचे सर्व्हर डाऊन असल्याने कित्येक विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र काढता आले नव्हते. तेव्हा अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता.

रेल्वे भरतीच्या परीक्षेत ज्या उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी नाकारण्यात आले होत, त्याची पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी शिवसैनिकाकडून करण्यात आली होती. यावर रेल्वे बोर्डानी सकारात्मकता दाखवली आहेत. रेल्वे भरतीत जे उमेदवार परीक्षांपासून वंचित राहिले, त्यांनी रेल्वे बोर्डाकडे संपर्क करावा. त्यांची फेरपरीक्षा रेल्वेकडून घेण्यात येणार आहे. तशी तयारीसुद्धा आता रेल्वे भरती बोर्डाकडून करण्यात येत आहे.
अनिल देसाई- खासदार, शिवसेना

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here