घरमुंबईअंगावरून गेली भरधाव मोटार, पण बचावला साडे तीन वर्षांचा ‘अम्मार’

अंगावरून गेली भरधाव मोटार, पण बचावला साडे तीन वर्षांचा ‘अम्मार’

Subscribe

'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय मालाड मालवणी येथे आला आहे

‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय मालाड मालवणी येथे आला आहे, घराच्या बाहेर खेळणाऱ्या साडे तीन वर्षांच्या मुलाला एका भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने धडक देऊन संपूर्ण मोटार मुलाच्या अंगावरुन जाऊन मुलगा सुखरूप असून सोमवारी त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी मालाड पश्चिम मालवणी येथे घडली होती. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी मोटरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

असा घडला प्रकार

अम्मार मनिहार असे या सुदैवी मुलाचे नाव आहे. अवघा साडेतीन वर्षांचा अम्मार हा मालाड मालवणी गेट नंबर ८ येथे आई वडील आजी आजोबा सोबत राहण्यास आहे. शुक्रवारी सायंकाळी अम्मार हा घराशेजारी एकटाच खेळत होता. दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या एका मोटारीने अम्मारला धडक देऊन त्याला चिरडत पुढे गेली. हा भीषण अपघात बघणाऱ्यांनी अम्मार जिवंत असेल अशी आशाच सोडली होती.

- Advertisement -

तुमचा विश्वास बसणार नाही, पण हा चिमुकला अजून जिवंत आहे!

शुक्रवारी संध्याकाळी मालाडच्या मालवणी गेट क्रमांक ८ जवळ घडलेल्या एका भयंकर प्रकाराचं CCTV फुटेज सध्या सोशल मीडियावर भलतंच व्हायरल होऊ लागलं आहे. या फूटेजमध्ये एका चिमुकल्यावरून एक कार गेल्याचं दिसत आहे. कारची पुढची आणि मागची चाकं या चिमुकल्याच्या आंगावरून गेली. त्यानंतर मुलाला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारांनंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला असून त्याची प्रकृती ठीक आहे. दरम्यान, या कारचालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलाच्या उपचाराचा सर्व खर्च या कारचालकाने केला आहे.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Tuesday, September 15, 2020

अम्मार ला नानावटी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, अम्मारच्या चेहऱ्याला मांडीला खरचटले होते, व त्यांच्या छातीच्या उजव्या बाजूला बरगडीला मार लागला होता. अम्मारवर नानावटी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून सोमवारी त्याला घरी सोडण्यात आलेले असून अम्मार हा सुखरूप आहे.  या प्रकरणी मालवणी पोलिसानी मोटार चालकाविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालवणे तसेच निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

तीन रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास दिला नकार

शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या अपघातानंतर जखमी झालेल्या अम्मारला घेऊन त्याच्या आईवडिलांनी मालाड येथील खाजगी रुग्णालयात फिरत होते, मात्र येथील तिन्ही  खाजगी रुग्णालयानी अम्मारला दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला होता. कारण अम्मारच्या सिटीस्कॅन अहवालात कोविड १९ संशयित असल्याचे म्हटले होते या कारणावरून अम्मार ला दाखल करण्यास नकार देण्यात आला होता असे अम्मारचे आजोबा मेहबूब मनिहार यांनी म्हटले आहे.

त्यानंतर अम्मारला नानावटी रुग्णालयात आणण्यात आले त्या ठिकाणी त्याला दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले, त्याची कोविड १९चाचणी देखील करण्यात आली सुदैवाने ती निगेटिव्ह आली. नानावटी रुग्णालयात अम्मारवर उपचार करून सोमवारी त्याला घरी सोडण्यात आले असून तो त्याची प्रकृती सुधार असल्याचे आजोबा मेहबूब मनिहार यांनी सांगितले.

मोटार चालकाची सर्वतोपरी मदत

अपघातानंतर मोटार चालक हा पळून न जाता त्याने अम्मारच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली आहे. त्याच्या रुग्णालयाचा तसेच औषध उपचाराचा सर्व खर्च मोटार चालकाने केला असून अम्मारला रुग्णालयातून घरी आणण्यापर्यत अपघात करणाऱ्या मोटार चालकाने मदत केल्यामुळे आमची त्याच्या विरुद्ध तक्रार नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.


ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची वयाच्या ८९ व्या वर्षी कोरोनावर मात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -