Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई लोकलमधील सामान्यांचा प्रवास आजही केंद्राच्या संमतीवर अवलंबून

लोकलमधील सामान्यांचा प्रवास आजही केंद्राच्या संमतीवर अवलंबून

Related Story

- Advertisement -

मुंबईची जीवनवाहिनी सुरू करण्यास केंद्राने परवानगी दिली तर ती लागलीच सुरू करू. आम्ही केंद्राला यासंदर्भात पत्र दिले आहे; पण केंद्राने याबाबत काहीही निर्णय न घेतल्याने लोकल सुरू होऊ शकली नसल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे. मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

रात्रीच्या गर्दीची स्थिती पाहून मुंबईच्या नाईट कर्फ्यूबाबत निर्णय होईल. मार्गदर्शक सूचना आल्या, तर संचारबंदी कायम राहील. नाहीतर अन्यथा संचारबंदी उठवली जाईल, असे अस्लम शेख यांनी स्पष्ट केले. कदाचित ही संचारबंदी १५ जानेवारीपर्यंत वाढू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisement -

राज्यातील कोरोनाची साथ बर्‍यापैकी नियंत्रणात आल्यामुळे मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेन सामान्य प्रवाशांसाठी कधी खुली होणार, या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करत आहे. कमी गर्दीच्या वेळेत सरसकट सर्व प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यानुसार सामान्य लोकांना सकाळी सात वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजेनंतर रेल्वेने प्रवास करण्याची मुभा मिळू शकते.

या काळात रेल्वे सेवेवरचा ताण कमी असतो. त्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका तुलनेत कमी आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून या प्रस्तावाची चाचपणी सुरु असून लवकरच मुंबईतील लोकल ट्रेनचे नवे वेळापत्रक जाहीर होऊ शकते, असे सांगण्यात आले.

- Advertisement -