घरमुंबई" त्या " दोन बेवारस बॅग ने उडवली खळबळ !

” त्या ” दोन बेवारस बॅग ने उडवली खळबळ !

Subscribe

केडीएमटीच्या बसमध्ये बेवारस बॅग आढळून आल्याने सर्वांचीची धावपळ उडाली होती. त्यामुळे तब्बल एक तास बस थांबवून ठेवण्यात आली होती. पोलिसांनी बॅगची तपासणी केल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. कागदपत्र व ओळखपत्रावरून ही बॅग गिरीश शहा नामक इसमाची असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्या बेवारस बँगने सर्वांची झोप उडवली होती.

केडीएमटीची निवासी बस ही दुपारी बाराच्या सुमारास एमआयडीसी मधील ओमकार शाळेजवळील बस स्टॉपवरून डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या दिशेला निघाली. यावेळी बसमध्ये प्रवासी चढल्यानंतर त्यांना शेवटच्या सीटवर काळया रंगाच्या दोन बॅग आढळून आल्या. प्रवाशांनी या बॅगा कंडक्टरच्या निदर्शनास आणून दिल्या. कंडक्टरने बसमधील प्रवाशांकडे विचारपूस केली. कोणत्याही प्रवाशाच्या बॅग नसल्याचे स्पष्ट झाले. कोणी तरी प्रवासी बसमध्ये विसरून गेला असेल अशी धारणा सर्वांची झाली. पण बेवारस बॅग घातकही असू शकते. त्यामुळे याकडे गांभिर्यातेने पाहत कंडक्टरने बस थांबवून त्वरीत मानपाडा पेालिसांना पाचारण केले.

- Advertisement -

तोपर्यंत या बॅगा रस्त्याच्या एका कडेला ठेवण्यात आल्या होत्या. माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दोन्ही बॅगांची कसून तपासणी केली. त्यावेळी बॅगेत कागदपत्र बँक पासबूक इत्यादी सामान आढळून आले. मात्र कागदपत्र व ओळखपत्रावरून ही बॅग गिरीश शहा नामक इसमाची असल्याचे स्पष्ट झाले. बॅगा पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी केली हेाती तर तब्बल एक तास बस थांबवून ठेवण्यात आली हेाती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -