घरमुंबईदुसरीतील विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण करणारा शिपाई अटकेत

दुसरीतील विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण करणारा शिपाई अटकेत

Subscribe

चेंबूर येथील एका प्रसिद्ध शाळेत दुसर्‍या इयत्तेत शिकणार्‍या विद्यार्थ्याचे अश्लील चाळे करणार्‍या शाळेतील ३० वर्षीय शिपायाविरुद्ध चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पीडित विद्यार्थी हा त्याच शाळेतील एका शिक्षिकेचा मुलगा आहे. गुरुवारी उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

पीडित मुलगा हा ७ वर्षांचा असून, चेंबूर परिसरात असलेल्या एका प्रतिष्ठित शाळेत इयत्ता २ री मध्ये शिकत आहे. त्याच शाळेत या पीडित मुलाची आई शिक्षिका आहे. मागील काही दिवसांपासून या शाळेतील ३० वर्षांचा शिपाई या विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे करीत असे, याबाबत कुणाला सांगू नको, अशी धमकी तो पीडित मुलाला देत असे. गेल्या काही दिवसांपासून मुलगा शांत का आहे म्हणून त्याला आईने विश्वासात घेऊन विचारले असता, त्याने घडलेला प्रकार आईला सांगितला. हे ऐकून आईला धक्काच बसला, तिने याबाबत शाळा प्रशासनासोबत चर्चा करून अखेर गुरुवारी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चेंबूर पोलिसांनी शिपायाविरुद्ध पोस्को गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -