घरट्रेंडिंगआश्चर्य! लोणार सरोवातील पाण्याला आला 'लाल' रंग!

आश्चर्य! लोणार सरोवातील पाण्याला आला ‘लाल’ रंग!

Subscribe

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील खाऱ्या पाण्याचे सरोवर जगातील आश्चार्य म्हणून ओळखले जाते. पण हे सरोवर सध्या कुतूहलाचा विषय ठरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणार सरोवरातील पाण्याच्या रंगात बदल झाला आहे. पाण्याचा रंग बदलण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण सध्या लोणार सरोवर हे तेथील नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. लवकरच हा पाण्याचा रंग का बदलला यावर संशोधन करावे अशी मागणी अभ्यासकांकडून केली जात आहे.

हे जागतिक दर्जाचे बेसॉल्ट खडकापासून बनलेले एकमेव सरोवर आहे. या खाऱ्या पाण्याच्या सरोवर परिसरात असलेल्या मातीमध्ये चुंबकीय गुणधर्म आहेत. या सरोवराचा अभ्यास करण्यासाठी जगाच्या विविध भागातून संशोधक नेहमी येतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यात लोणार सरोवर परिसरात कोणीही अभ्यासक येऊ शकलेले नाहीत. लोणार सरोवरात हॅलोबॅक्टेरिया आणि ड्युनोलिला सलीना नावाच्या कवका बुरशीची खाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाल्यामुळे पाण्याचा रंग लाल झाला असावा, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

निळे व हिरवे दिसणारे सरोवरातील पाणी दोन दिवसांपासून लाल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमधून आश्चार्य व्यक्त होत आहे. नागरिकांनी त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. पाण्याचा बदलेला रंग पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. रंग बदल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आले नाही. लवकरच सरोवरातील पाण्यात झालेले बदल अभ्यासले जाणार असून, संशोधन करणाऱ्या संस्थांकडे पाण्याचे नमुने पाठविण्यात येणार आहेत.


हे ही वाचा – सावधान! कोरोनापेक्षा मोठी ५ संकटं पृथ्वीवर येणार आहेत, नासाने दिले संकेत!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -