घरमुंबईरुग्णवाढीपुढे महापालिकेची यंत्रणाही पडली तोकडी

रुग्णवाढीपुढे महापालिकेची यंत्रणाही पडली तोकडी

Subscribe

पश्चिमेकडील भागाने घाटकोपरची चिंता वाढवली

पूर्व उपनगरातील घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या दोन विधानसभा क्षेत्रांमध्ये मोडणार्‍या महापालिकेच्या एन विभागात सुरुवातीपासून कोरोनाची रुग्ण आढळून येत होते. परंतु सुरुवातीला पहिल्या पाच क्रमांकामध्ये असणार्‍या या महापालिकेच्या ‘एन’ विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी आपल्या आरोग्य विभागाच्या अधिकारी,कर्मचार्‍यांसह अन्य महापालिकेच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने येथील संसर्ग एवढा नियंत्रणात आणला होता की, पुन्हा याठिकाणी करोनाच्या विषाणुला प्रवेशच मिळणार नाही. परंतु त्यानंतर संथगतीने सुरु झालेल्या संसर्गाचे एवढे वाढले की रुग्णांना उपचार यंत्रणा राबवताना तसेच संशयित रुग्णांचा शोध घेतानाच या ‘एन’ विभागातील महापालिकेची यंत्रणाच तोकडी पडू लागली. मात्र,पश्चिमेकडील बाधितांमुळे घाटकोपरला हुडहुडी भरल्याचे दिसून येते.

घाटकोपर पूर्व व पश्चिम बाजुस १२ एप्रिल २०२० रोजी केवळ २५ रुग्ण होते. परंतु त्यावेळी हे रुग्ण इतर वॉर्डाच्या तुलनेत अधिकच होते. परंतु यानंतर घाटकोपरमध्ये अशाप्रकारे महापालिकेची यंत्रणा कामाला लागली की त्यांच्याबरोबरच पहिल्या पाचमध्ये असणार्‍या वॉर्डातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच गेली. या उलट घाटकोपरमधील संख्या कमी होवून त्यांचा क्रमांक खाली घसरत गेला. घाटकोपरमध्ये कोरोना नियंत्रणात ठेवण्याचा जो प्रयत्न झाला होता,त्याचे कौतूकही झाले. परंतु त्यानंतर दबक्या पावलाने चोराने घरात प्रवेश करावा,तसे या विभागात कोरोना विषाणूने प्रवेश केला आहे. पण त्यानंतरच दोन महिन्यात ही रुग्ण संख्या वाढून आता २८७८वर पोहोचली आहे. म्हणजे दोन महिन्यांच्या कालावधी २८५० रुग्ण वाढले. सुरुवातीला या विभागात संथगतीने रुग्ण वाढत होते. त्यामुळेच आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी ११६६ रुग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर उर्वरीत १६२६ रुग्णांवर उपचार घेत आहे. म्हणजेच मागील १५ ते २० दिवसांमध्येच सुमारे दीड हजारांहून रुग्ण आढळून आल्याचे स्पष्ट होते.

- Advertisement -

या विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी हे सक्षम आहेत. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवूनच काम करत आहेत. परंतु सुरुवातीला एका कोरोनाबाधित रुग्णांच्या अति संपर्कातील व इतर संपर्कातील अशाप्रकारे सरासरी १० ते १२ लोकांना क्वारंटाईन करणे आवश्यक होते. ते करण्यात आले नव्हते. विभागाचे वैद्यकीय अधिकारी हे या नव्यानेच आल्याने त्यांना विभागाची भौगोलिक रचना माहित नाही. तसेच क्वारंटाईन करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाकडे असल्याने ते केवळ दोन ते तीन लोकांनाच क्वारंटाईन करायचे. त्यामुळे ही बाब लक्षात येताच नगरसेवकांच्या सुचनेनुसार सहायक आयुक्तांनी महापालिका देखभाल विभागाच्या अधिकार्‍यांच्या मदतीने क्वारंटाईन करण्यात येणार्‍या अति जोखमीच्या लोकांची संख्या वाढवण्यात आली. बाधित रुग्णांच्या संपर्कातील सर्वांनाच क्वांरटाईन करण्यात येत असल्याने पुढे पॉझिटिव्ह रुग्णांचीही संख्या वाढू लागली.

घाटकोपर एन विभागातील रुग्णांची स्थिती.

- Advertisement -

एकूण बाधित रुग्ण : २८७८

बरे झालेले रुग्ण : ११६६

उपचार घेत असलेले रुग्ण : १६२५

रुग्ण दरवाढीचा दर : ३.४ टक्के

कोणत्या भागांमध्ये आढळून आले कोरोनाबाधित रुग्ण
कामराज नगर, रमाबाई नगर, पटेल चौक, नित्यानंद नगर, गौतम नगर, बर्वे नगर, रामजी नगर, भटवाडी, राजावाडी पाईप लाईन, गावदेवी रोड, वर्षा नगर, हनुमान नगर,

महापालिकेच्यावतीने रुग्णांची शोध घेण्यासाठी घरोघरी जावून ताप दवाखान्यांमार्फत तपासणी मोहिम राबवण्यात आली. तसेच येत्या मंगळवारीही महापालिकेच्यावतीने मान्सूनपूर्व साथीच्या आजारांसह करोना रुग्णांसाठी शिबिर आयोजित केला आहे.
-स्नेहल मोरे, स्थानिक नगरसेविका, शिवसेना पुरस्कृत अपक्ष.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जागा मिळत नाही आणि खासगी रुग्णालयांचे दर परवडत नाही. आतापर्यंत आपण ६५ दिवस दरदिवशी १५०० लोकांना जेवण पुरवले. परंतु महापालिकेची कोणतीही मदत न घेता ५५०० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले.-बिंदु त्रिवेदी, स्थानिक नगरसेविका, भाजप.

माझ्या विभागात जेव्हापासून दारुचे दुकान उघडले तेव्हापासून करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. आज ही संख्या ६०पर्यंत पोहोचलेली आहे. विभागातील खासगी रुग्णालयांमध्ये कुठेही सरकारी दराप्रमाणे उपचार होत नाही. आधी दीड ते दोन लाख रुपये डिपॉझिट भरायला सांगितले. सरकारच्या यावर कुठेही अंकूश दिसून येत नाही.
-ज्योती हारुन खान, स्थानिक नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस.

विभागाचे सहायक आयुक्त व त्यांच्या टिमचे योग्य सहकार्य लाभत असल्याने रुग्ण संख्या वाढत असली तरी यातून निर्माण होणारे प्रश्न लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून सोडवले जातात.आतापर्यंत राजावाडी रुग्णालयात पीपीई किटसह मास्क व फेस मास्कचे वाटप केले आहे.
-डॉ. अर्चना संजय भालेराव, स्थानिक नगरसेविका, शिवसेना.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -