घरमुंबईबापरे! भांडी व्यवस्थित घासत नाही म्हणून महिलेचे चक्क तोडले दात

बापरे! भांडी व्यवस्थित घासत नाही म्हणून महिलेचे चक्क तोडले दात

Subscribe

महिलेला शिवीगाळ करून हाताने तोंडावर मारला ठोसा

भांडी व्यवस्थित घासत नाही म्हणून हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेचे दात पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे घडला आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

असा घडला प्रकार

अनवर अली असे आरोपीचे नाव आहे. भिवंडी शहरातील गुरुनाथ पाटील यांच्या हॉटेलमध्ये अन्वर अली हा नोकरीला आहे. त्याच हॉटेलमध्ये कमला शंकू (४५) ही महिला ही आपल्या मुलीसोबत धुण्याभांड्याचे काम करीत होती. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अनवर अली हा कमला शंकू या महिलेच्या घरी आला व तुम्ही दोघी व्यवस्थीत काम करीत नाही, भांडे तशीच खरकटी सोडून जाता, असे बोलून मायलेकी सोबत वाद घालू लागला.

- Advertisement -

या दरम्यान कमला शंकू हिने माझ्या मुलीला काही बोलू नको माझ्यासोबत बोल, असे बोलताच संतापलेल्या अनवर अलीने कमला या महिलेला शिवीगाळ करून हाताने तोंडावर ठोसा मारला. यामध्ये या महिलेचे दोन दात पडून त्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. कमला या महिलेने या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अनवर अली याच्याविरुद्ध तक्रार दाखल करताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून अनवर अली याला अटक केली आहे.


मुंबई मेट्रो रेल्‍वेच्‍या कामासाठी ‘या’ भागात होणार पाणीकपात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -