घरमुंबईवसईतील पणजीने केले 111 व्या वर्षात पदार्पण

वसईतील पणजीने केले 111 व्या वर्षात पदार्पण

Subscribe

आयुष्याचा कोणतीही शास्वती नसलेल्या आजच्या काळात वसईतील एका पणजीबाईने चक्क 111 व्या वर्षात पदार्पण करून सर्वांना सुःखद धक्का दिला आहे. वसईच्या पूर्वेकडील एव्हरशाईनसिटी येथे एकत्र कुटुंबात राहणार्‍या जैनसबी पठाण यांचा रविवारी 110 वा वाढदिवस होता. मुले, सुना, नातवंडे, नातसुना, पणतु अशा 60-70 जणांच्या भरगच्च एकत्र कुटुंबात राहणार्‍या जैनसबी यांनी 111 व्या वर्षात पदार्पण केले असले तरी त्यांचा उत्साह भल्याभल्यांना लाजवणारा आहे. चश्मा न लागलेले चाणाक्ष डोळे, खणखणीत आवाज आणि तिखट कान अशी त्यांची देहयष्टी पाहून सर्वांनाच हेवा वाटतो. आजही त्यांच्या सल्ल्याशिवाय कुटुंबात कोणताही निर्णय घेतला जात नाही.

जैनसभी पणजी यांना मकखान आणि शेरखान ही दोन मुले आहे. या दोघांना एकूण सहा मुले आहेत. ही सहा मुलेही बाप झाली आहेत. अशा चार पिढ्या एव्हरशाईन येथे स्वतंत्र घर वजा बंगल्यात रहात आहेत. त्याचे श्रेयही जैनसबी पणजीला जाते. आमच्या कुटुंबातील एकी, आनंद, समृद्धी याचे श्रेय आई जैनसबीला जाते. अशी कृतज्ञता मकखान आणि शेरखान यांनी व्यक्त केली आहे. या पणजीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व धर्मातील हितचिंतक उपस्थित झाले होते. 10 बाय 4 फुटांचा केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. महापौर रुपेश जाधव यांनी यावेळी उपस्थित राहून जैनसबी यांना दिर्घायुषी होण्याच्या शुभेच्छा देतानाच त्यांचा आशिर्वादही घेतला. त्यांच्या वाढदिवसानिमीत्त खानबंधुंनी 110 गरीब-गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य करण्याची यावेळी वसा घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -