घरमुंबईमेट्रो २ बच्या कामाला गती मिळणार

मेट्रो २ बच्या कामाला गती मिळणार

Subscribe

उर्वारित कामांसाठी निविदा जाहीर

मुंबईतील रखडलेल्या मेट्रो २ ब च्या कामाला आता लवकरच गती मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या उर्वारित कामांसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नवी निविदा बुधवारी जाहीर केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच या मेट्रो 2 बच्या प्रकल्पाच्या क्रॉन्टक्टरवर कामाची गती न पाळण्याचा ठपका ठेवित कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे मेट्रो २ बच्या राहिलेल्या उर्वारित कामांसाठी एमएमआरडीएने नव्याने निविदा मागविल्या आहेत.

एमएमआरडीए प्रशासनातर्फे हाती घेण्यात आलेल्या मेट्रो २ ब प्रकल्पाचे काम गेल्या काही दिवसांपासून संथगतीने सुरु होते. त्यामुळे याची गंभीर दखल घेत प्रशासनाने याचे कामकाज पाहणार्‍या कॉन्ट्रक्टरवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामुळे मेट्रो २ बचे कामकाज केव्हा पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर बुधवारी एमएमआरडीए प्रशासनाने यासंदर्भातील तीन वेगवेगळ्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.

- Advertisement -

ज्यात या प्रकल्पाचे रखडलेल्या कॉरिडोअरचे त्याशिवाय मानखुर्द येथील मंडाळे येथील प्रस्तावित मेट्रो कार डेपोचा आणि १५ स्थानकांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या कॉन्ट्रक्टरकडून पहिल्य निविदेतील फक्त ४.४८ काम पूर्ण करण्यात आले असून ३० महिन्यांत हे काम पूर्ण केले आहेत. एलिव्हेटड व्हायडट आणि पाच स्थानकांचा समावेश होता. ज्याची साधारण किंमती ५२१ कोटी इतकी आहे. आता नव्या निविदानुसार या प्रकल्पाची किंमत आता ४७४.५२ कोटी इतकी असणार आहे. तर हे काम पूर्ण करण्यासाठी ३० महिन्यांचा कालावधी दिला जाणार असून हा कालावधी कंत्राट सुरु झाल्यापासून असणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

त्याशिवाय दुसर्‍या निविदेत जुन्या कंत्राटदाराने मंडाळे येथील मेट्रो कार डेपोसाठी ३९०.४४ कोटी इतकी किंमतीच्या निविद्याच्या कामाअतंर्गत ३६ महिन्यात फक्त ६.९८ टक्केच काम पूर्ण केले आहे.यासाठी एमएमआरडीने नव्याने काढलेल्या निविद्यात ४६७.७५ कोटी इतक्या किंमतीचा उल्लेख केला आहे. तर हे काम पूर्ण करण्यासाठी ४२ महिने दिले जाणार आहेत.

- Advertisement -

त्यानंतर तिसर्‍या निविदेनुसार असलेल्या कामांत जुन्या कंत्राटदारांकडून फक्त ५.०७ टक्के इतकेच काम पूर्ण केले असल्याचे दिसून आले आहे. हे कंत्राट ईएसआयसी नगर अंधेरी ते वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील इनकॅम टॅक्स भवन या मार्गावरील कॉरिडोअरच्या सिव्हिल वर्कचे आणि दहा स्टेशनच्या बांधकामांचे होते. जुन्या निविदेनुसार या प्रकल्पाची किंमत १ हजार ८० कोटी इतकी होती. मात्र आता नव्या निविदेनुसार १,०५८.७१ कोटींचे हे कंत्राट असून ते पूर्ण करण्यासाठी ३० महिन्यांचा कालावधी असणार आहे. पहिल्या कंत्राटानुसार कंत्राटदाराने वेळेत काम पूर्ण केले नसल्याने एमएमआरडीए प्रशासनाने मेट्रो ७ च्या प्रकल्पातून देखील या कंत्राटदाराची हकालपट्टी केल्याचे समजते.

काय आहे मेट्रो २ ब प्रकल्प
डीएन नगर ते मानखुर्द येथील मंडाळे येथील मार्गावर हा प्रकल्प राबविला जाणार आहे. येथून सुमारे १०.५ लाख प्रवासी दिवसा मेट्रोतून प्रवास करण्याची शक्यता आहे.२०२१ पर्यंत हे कामकाज पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती.आता मात्र या विलंबामुळे हा प्रकल्प २०२२ च्या अखेरिसपर्यंत पूर्ण केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केला जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -