मानखुर्दमध्ये धक्का लागल्याने केली तरूणाची हत्या

केवळ धक्का लागलाने शुक्रवारी तरुणाची हत्या

Mumbai
मृत्यू

मानखुर्दमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ धक्का लागलाने शुक्रवारी तरुणाची हत्या करण्यात आली. या मृत तरूणाचे नाव श्रीराम शिवकुमार सिंह असे नाव असून या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

असा घडला प्रकार

शुक्रवारी रात्री ११.३० वाजेदरम्यान, सुरक्षारक्षक असलेले ब्रिजभूषण सिंह हे मावसभाऊ श्रीराम सिंह याच्यासोबत जात असताना लल्लुभाई कंपाऊंडमधील शिवप्रभात इमारतीजवळ त्यांचा एका तरुणाला धक्का लागला. हा तरुण ब्रिजभूषण आणि श्रीराम यांच्याशी वाद घालू लागला.

डोक्याला जबरदस्त मार लागल्याने मृत्यू

हा प्रकार घडत असताना काही लोक देखील तेथे जमली होती. त्यांनी देखील याबाबत हटकले म्हणून नितीन कांबळे, रितेश राम, अमीर हुसेन खान, सलमान अफसर शेख, गणेश उलिंद्री, इस्माईल शेख या सहाजणांनी ब्रिजभूषण आणि श्रीराम यांना जबरदस्त मारहाण केली. श्रीराम याच्यावर लाकडी सोफ्याच्या खुरांनी हल्ला केला. यामुळे श्रीराम याच्या डोक्याला जबर मार बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली.