घरमुंबईपोलीस असल्याची बतावणी करून कारसह मोबाईल व सोन्याचे कडे पळवले

पोलीस असल्याची बतावणी करून कारसह मोबाईल व सोन्याचे कडे पळवले

Subscribe

पोलीस असल्याची बतावणी करून होंडा सिटी कार, ॲपल कंपनीचा मोबाईल आणि सोन्याचे कडे असा एकूण 5 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.

पुणे 12 फेब्रुवारी (हिं.स.) बावधन येथे फोनवर बोलत थांबलेल्या कार चालकाला पोलीस असल्याची बतावणी करून त्याला धमकावून दारू पाजली. त्यानंतर होंडा सिटी कार, ॲपल कंपनीचा मोबाईल आणि सोन्याचे कडे असा एकूण 5 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. याप्रकरणी यश अजय चौधरी औंधगाव पुणे येथे रागत असलेल्या १८ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदीवली आहे. त्यानुसार अज्ञात चार इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सगळ चोरी झाले

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यश होंडा सिटी कार (बी आर ०७ / आर ०२८०) मधून बावधन येथून जात होता. त्याला फोन आल्याने त्याने कार बाजूला घेतली आणि फोनवर बोलू लागला. त्यावेळी चार अनोळखी इसम त्याच्याजवळ आले. त्यांनी पोलीस असल्याची बतावणी यशला केली. गाडीची डिक्की चेक करायची आहे असे सांगून यशला कारमधून खाली उतरवले. त्यानंतर यशकडून कारची चावी घेऊन त्याला दारू पाजली. यशला जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याच्याकडील ॲपल कंपनीचा मोबाईल फोन, सोन्याचे कडे आणि कार असा एकूण 5 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन आरोपींनी पोबारा केला. हा प्रकार देहूरोड कात्रज बायपासवर एचईएमआरएल कंपनी समोर बावधन ते युनायटेड क्रेन कंपनी पौड या दरम्यान घडला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -