घरमुंबई...तर माहुल उद्ध्वस्त झाले असते

…तर माहुल उद्ध्वस्त झाले असते

Subscribe

भारत पेट्रोलियमच्या चेंबूर माहुल येथील प्रकल्पात बुधवारी स्फोट होऊन आग लागली होती. या आगीमध्ये भारत पेट्रोलियमचे ४३ कर्मचारी कर्मचारी जखमी झाले. या आगीच्या ठिकाणापासून काही फुटावर एलपीजीचे गॅस टँकर उभे असतात.

भारत पेट्रोलियमच्या चेंबूर माहुल येथील प्रकल्पात बुधवारी स्फोट होऊन आग लागली होती. या आगीमध्ये भारत पेट्रोलियमचे ४३ कर्मचारी कर्मचारी जखमी झाले. या आगीच्या ठिकाणापासून काही फुटावर एलपीजीचे गॅस टँकर उभे असतात. बुधवारची आग या टँकरपर्यंत पसरली असती तर बीपीसीएलजवळ उभ्या असलेल्या टँकरमुळे आग आणखी भडकली असती तर ती आटोक्यात आणणे शक्य झाले नसते, असे सांगितले जात आहे. या परिसरात आता टँकर उभे करायची भीती वाटू लागली असल्याचे एम. डी. कुलीभुद्दीन या टँकर चालकाने सांगितले. आम्ही गॅसचा टँकर चालवताना मृत्यू सोबत घेऊन फिरतो. मात्र सरकारने या प्रकल्पाच्या बाजूला राहणार्‍या लोकांचा विचार करायला हवा असे कुलीभुद्दीन म्हणतो.

चेंबूर माहुल येथे भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल या कंपन्यांचे ज्वलनशील प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये एलपीजी गॅस भरण्यासाठी रोज ५०० हून अधिक टँकर येतात. टँकरमध्ये गॅस भरण्यासाठी टँकरचे चालक दोन – तीन दिवस आपला नंबर येण्याची वाट पाहात असतात. आग लागली तेव्हाही टँकर प्रकल्पाबाहेर उभे होते. आग भडकल्यानंतर या टँकरला पोलिसांनी येऊन तात्काळ हटवले होते. काही तासानंतर आहे त्याच ठिकाणी पुन्हा उभे करण्यात आले. या टँकरमध्ये एकावेळी २० टन (५०० ते ६००) किलो एलपीजी गॅस भरला जातो. गॅस नसला तरी टँकरमध्ये प्रेशर असतो. यामुळे हे टँकर खाली असले किंवा भरलेले असले तरी ते ज्वलनशीलच असतात, असे कुलीभुद्दीन यांनी ‘महानगर’ला सांगितले.

- Advertisement -

या आगीदरम्यान भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल प्रकल्पांच्या बाजूला ५०० टॅन्कर होते. हे टँकर भरलेले असते तर त्यात १० हजाराहून अधिक टन गॅस असता. या गॅसने पेट घेतला असता तर मुंबईत हाहाःकार उडाला असता. हे टँकर खाली असले तरी त्याचा परिणाम मुंबईला जाणवला असता. याचा विचार पेट्रोलियम कंपन्यांनी करायला हवा, असे आता माहुलवासी बोलू लागले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांच्या बाहेर टँकर उभे करण्यापेक्षा इतर ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करायला हवी अन्यथा पुढे काही अशी दुर्घटना घडल्यास टँकरमुळे त्याचा परिणाम आणखी मोठा जाणवू शकतो असे तिथले नागरिक सांगतात.

स्वच्छ भारत अभियानचे धिंडवडे –
मुंबई बाहेर उरण, चाकण, अलिबाग, उसर, औरंगाबाद, शिक्रापूर, अकोला येथील धनज, मनमाड, नागपूर या ठिकाणी या कंपन्यांचे प्रकल्प आहेत. या ठिकाणी टँकरच्या पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था आहे. वाहन चालकांच्या सोयीसाठी शौचालयांची व्यवस्था आहे. मुंबईमधील प्रकल्पांजवळ अशी व्यवस्था नाही. यामुळे आम्हाला उघड्यावर शौच करावा लागतो. केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान राबवले आहे. सरकार उघड्यावर शौच करू नका, असे सांगते. मात्र आम्हाला याठिकाणी नाईलाजाने उघड्यावर शौच करावा लागतो.
– एम. डी. कुलीभुद्दीन

- Advertisement -

बुधवारी आग लागली तेव्हा मी टँकरमध्ये झोपलो होतो. दुपारच्या सुमारास मोठा आवाज झाला, काय झाले हे न पाहता जीव घेऊन पळत सुटलो. अर्ध्या तासाने पुन्हा टँकरजवळ आलो तेव्हा जवळच प्लांटला आग लागली होती. पोलीस सर्वाना पळवून लावत होते. मी टँकर येथून काढला. इथले ट्राफिक कमी झाल्यावर पुन्हा टँकर घेऊन आलो . आमच्या टँकरमध्ये ज्वलनशील गॅस असतो. बुधवारची दुर्घटना मोठ्या प्रकारची असती तर आमचे टँकरही या आगीच्या भक्षस्थानी पडले असते.
– मोनू, ड्रायव्हर

आम्हाला पुन्हा झोपडपट्टीत न्या

विविध प्रकल्पांतर्गत ग्रस्त झालेल्या नागरिकांना मुंबई महापालिकेने माहुल येथे स्थलांतरित केले. परंतु तेथे त्यांना कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, सांडपाण्याचे पाईप फुटलेले असून, सर्वत्र कचर्‍याचे ढीग पडले आहेत. त्यामुळे या इमारतींची अवस्था झोपडपट्टीपेक्षा अधिक बिकट असल्याचा संताप येथील नागरिकांनी व्यक्त केला. त्याचबरोबरच येथे स्थलांतरित केल्यानंतर रोजगाराचा प्रश्नही निर्माण झाल्याने अनेकांसमोर बेरोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

न्यायालयाने जलवाहिनी लगतच्या झोपडपट्ट्या हटवण्याचे आदेश महापालिकेला दिल्यानंतर अंधेरी, वांद्रे, साकीनाका तसेच कांजुरमार्ग, मुलुंड, गोरेगाव आणि राम मंदिर रोड येथील विविध प्रकल्पांमध्ये येणार्‍या झोपड्या तोडण्यात आल्या. या प्रकल्पग्रस्तांना महापालिकेने माहुल येथे हलवले होते. परंतु, येथे हलवल्यानंतर त्यांना आवश्यक असलेल्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. या परिसरात शाळा, बाजार, दवाखाने यांची कोणतीही सुविधा नाही. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. परिसरातील सर्व इमारतींचे सांडपाण्याचे पाईप फुटलेले आहेत.

दोन इमारतींमधील गटार तुंबलेले असल्याने ते पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना येथे राहणे अवघड झाले आहे. त्यातच या ठिकाणी कोणताही रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थलांतरित करण्यात आलेले सर्व नागरिक झोपडपट्टी राहत असल्याने ते मिळेल तो रोजगार करून आपला उदरनिर्वाह करत असे. परंतु, या ठिकाणी स्थलांतर केल्याने त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. झोपडट्टीमधील अवस्थेपेक्षा इमारतीमध्ये अवस्था अत्यंत वाईट असल्याने आम्हाला पुन्हा झोपडपट्टीत न्या, अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -