घरमुंबईदक्षिण मुंबईत यंदा १८ हजार नवे मतदार

दक्षिण मुंबईत यंदा १८ हजार नवे मतदार

Subscribe

तरुणांना मतदानाकडे वळवण्यासाठी आयोगाची सेल्फी कल्पना

मुंबईसह देशभारत सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या सर्वच राजकीय पक्षांनी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. यात सर्वांच्या नजरा ह्या नवं मतदारांवर लागून राहिल्या आहेत. नव मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय पक्षांची दमछाक सुरू असताना या मतदारांनी १०० टक्केे मतदान करावे यासाठी कल्पना लढवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पहिल्यांदा मतदान करणार्‍यांसाठी राज्य आयोगाने ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’ या अभियानाची घोषणा केली आहे. यंदा दक्षिण मुंबईतून १८ हजार नवं मतदारांची नोंद झाली असून यापैकी किती मतदार मतदानासाठी येतात, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाचे विविध प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दक्षिण मुंबईतील मतदारांसाठी माय फर्स्ट व्होट सेल्फी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची घोषणा करताना शिवाजी गोंधळे म्हणाले की, मतदानाच्या दिवशी म्हणजे सोमवार,29 एप्रिल 2019 रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही स्पर्धा असेल. युवा मतदाराने मतदान केल्यानंतर मतदान केद्रांच्या विहीत 100 मीटर मर्यादेच्या बाहेर येवून आपली सेल्फी काढावी व ती जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या [email protected] या ई-मेल अथवा 9372830071 या व्हॉट्सअप वर पाठवावी. ही सेल्फी पाठवातांना त्यांने/तिने पुढील प्रमाणे स्पर्धेत सहभागाची नोंद करून आपले छायाचित्र व माहिती द्यावी. यात नाव,आडनाव, विधानसभा मतदार संघाचे नाव/नवमतदाराचे नाव/ईपीक नंबर किंवा मतदार यादी भाग क्रमांक व मतदार यादीतील अनुक्रमांक असावा. उदा- सुशांत परूळेकर/सायन कोळीवाडा/SAV2064282 ईपीक नंबर नसेल तर उदा- सुशांत परूळेकर/सायन कोळीवाडा/यादी भाग क्रमांक 328/585 अशा प्रकारची नोंद असावी, असे त्यांनी यावेळी जाहीर केले. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक मतदारांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

- Advertisement -

मुंबई शहर जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील 18 हजार मतदारांची नोंद करण्यात आली आहे. हे १८ हजार मतदार धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा अशा १० विधानसभा मतदार संघातील आहेत.

ते ठरणार युवादूत
या उपक्रमाच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघातून 10, याप्रमाणे 100 नवमतदारांची अंतिम निवड केली जाईल. या निवडलेल्या 100 नवमतदारांना विधानसभा-2019 साठी मुंबई शहर जिल्ह्याचे ‘युवा मतदार दूत’ म्हणून नेमले जाईल. त्यांना पुढील स्विपच्या कार्याक्रमात सहभागी करून घेतले जाईल. या 100 मधूनही निवडक 10 युवा मतदारांचा त्यांच्या महाविद्यालयात/भागात स्टँडीज उभारून सन्मान केला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -