घरमुंबईपनवेल पालिकेच्या इमारतीतच अग्निसुरक्षा नाही

पनवेल पालिकेच्या इमारतीतच अग्निसुरक्षा नाही

Subscribe

पनवेल महानगरपालिका हद्दीत बांधकाम परवानगी घेत असताना मंजूर नकाशांसहीत फायर यंत्रणेची अट अपरिहार्य आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका नव्याने बांधकाम करण्याकरिता परवानगी देत नाही. मात्र जी संस्था बांधकाम परवानगी देते त्या संस्थेच्या इमारतीमध्येच फायर यंत्रणेचा आभाव असल्याने ही इमारतच असुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

पनवेल नगरपालिका ही जुनी इमारत महापालिकेच्या नावाने रुपाला आली आहे. त्यातच नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीमध्ये अचानक आग लागली तर आग विझविण्यासाठी असणारी सामुग्रीचा पनवेल महानगरपालिकेमध्ये उपलब्ध नसल्यामुळे याठिकाणी नागरिकांसह कर्मचार्‍यांच्या जीवाचा प्रश्न गंभीर झाला आहे. महानगरपालिकेच्या दोन्ही इमारतींमध्ये फिरल्यानंतर याठिकाणी फायर हायड्रंड हे कोठेही ठेवलेले दिसून येत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये पनवेल शहरात विविध ठिकाणी मोठ मोठे अग्नितांडव झाले आहेत. यामध्ये जिवीतहानी, वित्तहानी झाली होती. तक्का येथील झोपडपट्टीला लागलेली आग, शिवाजीनगर झोपडपट्टी तसेच मिरची गल्ली येथे लागलेली आग अशी अनेक उदाहरणे समोर असतानाही पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही.

- Advertisement -

पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयात पनवेल शहराशी संबंधित विविध प्रकल्पाची महत्वाची कागदपत्रे, पुरातन रेकॉर्ड असून जुन्या व नवीन इमारतीत शेकडो कर्मचारी काम करीत असतात. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची काळजी घेण्यात न आल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. याठिकाणी काम करणारे कर्मचारी तसेच कागदपत्रांच्या रेकॉर्डची सुरक्षा प्रशासनाने वार्‍यावर सोडल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -