घरमुंबईवांगणीतील ‘त्या’ कमानीसाठी परवानगीच नाही

वांगणीतील ‘त्या’ कमानीसाठी परवानगीच नाही

Subscribe

स्थानिकांचा आरोप

वांगणीच्या रस्त्यावर उभारण्यात येत असलेली कमान वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. ग्रामपंचायत तसेच संबंधित विभागांची परवानगी न घेताच हे काम सुरू करण्यात आले असल्याचा आरोप करीत काही ग्रामस्थांनी ही कमान उभारण्यास विरोध दर्शवला आहे.

वांगणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वांगणी गावात जाणार्‍या रस्त्यावर कमान उभारण्याचे काम सुरू आहे. ही कमान उभारताना ग्रामपंचायत वा संबंधित विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या कमानीला आमचा विरोध असल्याचे दिनेश भोईर, हरिश्चंद्र म्हसकर, मोहन कांबरी, यशवंत खंडागळे आदींसह अनेक ग्रामस्थांनी वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंचांना दिलेल्या निवेदनाद्वारे 2 मार्च 2019 रोजी स्पष्ट केले आहे. रस्त्यावर कमानी उभारण्यावरून यापूर्वीदेखील वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर भविष्यात कुठलाही वाद निर्माण होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने याप्रकरणी योग्य तो कायदेशीर निर्णय घ्यावा अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती दिनेश भोईर यांनी दिली. मात्र, त्यानंतरही ग्रामपंचायत तसेच प्रशासनाकडून या निवेदनाची कोणतीही दखल घेण्यात येत नसल्याचे भोईर यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

पंचायत समितीकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शनानुसार कमान उभारणीसंदर्भात नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. याप्रकरणी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
केतकी शेलार, सरपंच, वांगणी ग्रामपंचायत

वांगणी ग्रामपंचायतीमधून कमान उभारण्यासंदर्भात मार्गदर्शन मागवण्यात आले होते. त्यानुसार त्यांना नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
शीतल कदम, गटविकास अधिकारी, अंबरनाथ पंचायत समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -