घरमुंबईबेस्टमध्ये ८० इलेक्ट्रीकल बसगाड्या येणार

बेस्टमध्ये ८० इलेक्ट्रीकल बसगाड्या येणार

Subscribe

केंद्र सरकारच्या धोरणानुसार मोठ्या शहरांना विद्युत (इलेक्ट्रीकल) बसगाड्या खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याची योजना आखण्यात आलेली आहे. त्यानुसार बेस्टच्या ताफ्यात लवकरच ८० इलेक्ट्रीकल बसगाड्या येणार असल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेमध्ये दिली. केंद्रीय अवजड उद्योग विभागाच्या फेम योजनेंतर्गत इकोफ्रेंडली गाड्या सेवेत आणण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते आहे. त्यात बसचालक आणि देखभालीची जबाबदारी खासगी सहभागावर सोपवण्यात आली आहे. यामध्ये ६० टक्के वाटा बेस्टचा असून, उर्वरित ४० टक्के वाटा खासगी असणार आहे. मुंबई, पुणे, दिल्ली या शहरांनाच अशा पर्यावरणपूरक बसगाड्या देण्यात आल्या आहेत. बेस्टच्या ताफ्यात येणार्‍या ८० इलेक्ट्रीकल बसगाड्यांपैकी ४० बसगाड्या एसी, तर ४० नॉन एसी बसगाड्या असणार आहेत. या बसगाड्यांवर वाहक (कंडेक्टर) बेस्टचा असणार आहे. यासाठी ५० कोटी रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून देण्यात येणारे अनुदान परत जाऊ नये. यासाठी बेस्ट प्रशासनाने हायकोर्टात या इलेक्ट्रीकल बसगाड्यांसाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार हायकोर्टाने परवानगी दिली असून इलेक्ट्रीकल बसगाड्यांचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेद्रकुमार बागडे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -