घरमुंबईती काळरात्र विसरु शकत नाहीत

ती काळरात्र विसरु शकत नाहीत

Subscribe

पोलिस निरिक्षक हेमंत बावधनकर जागविल्या आठवणी

संपुर्ण देशाला हादरवणार्‍या २६/११ हल्ल्याला यंदा १० वर्षे पुर्ण होत आहेत. पण १० वर्षानंतर देखील या हल्ल्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले कित्येकजण ती काळरात्र विसरु शकत नाहीत अशी आठवण सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात सध्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक असणारे हेमंत बावधनकर यांनी करुन दिली.या हल्ल्यातील दहशतवादी अजमल आमीर कसाब जेव्हा गिरगाव चौपाटीजवळ पकडला गेला त्यावेळी बावधनकर तिथे प्रत्यक्ष उपस्थित होते. डी.बी.मार्ग पोलीस ठाण्यात त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणुन कर्तव्यावर असणारे हेमंत बावधनकर यांनी चौपाटीजवळ कसाब आणि त्याचा साथीदार अबु इस्माइलला घेरल्यानंतर गाडी वळवुन पळुन जाताना पोलिसांतर्फे करण्यात आलेल्या गोळीबारात स्वतच्या पिस्तुलातून गोळ्या चालवल्या. त्यादिवशी घडलेला तो थरार आजही डोळ्यासमोर उभा राहतो आणि मन हेलावून टाकतो, असे सांगताना बावधनकर भावूक झाले होते.

ती काळरात्र होती, असे काही घडणार आहे याची जराही कल्पना न्हवती.मी नेहमीप्रमाणे कामावर असताना रात्री ८ च्या सुमारास मला वरीष्ठांनी आपल्या केबिनमध्ये बोलावले, ठिकठिकाणी गोळीबार होत असल्याची कल्पना दिली. रात्री १० ते ११ दरम्यान या हल्ल्याबद्दलची प्रत्येक बातमी कानावर पडत होती. ११ च्या सुमारास आम्ही गिरगाव चौपाटी परीसरात बंदोबस्त लावला आमचे पथक त्या ठिकाणी तैनात होते. रस्यावर बर्‍यापैकी गर्दी असल्याने ती गर्दी हटवणे गरजेचे होते म्हणून आम्ही त्या कामाला लागलो. रस्ता मोकळा झाल्यानंतर संपुर्ण रस्त्यावर आम्ही बॅरीगेट्स लावले. जवळपास ११.३० नंतर आंम्हाला कंट्रोल रुमवरुन फोन आला. स्कोडा गाडीतून दोन अतिरोकी गिरगाव चौपाटीच्या दिशेने येत असल्याची माहीती आम्हाला देण्यात आली. त्यानुसार आम्ही सावध झालोे. १२ नंतर काही वेळातच ती गाडी समोर आली बॅरीगेट्स लावले असल्याने आम्ही त्यांना शरण येण्याच्या सुचना दिल्या, मात्र समोरुन कोणतेच उत्तर मिळाले नाही, शेवटी ती गाडी वळवुन ते दोघेही दहशतवादी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांची गाडी रस्त्याच्या दुभाजकावर आदळली पण त्यांनी आमच्यावर गोळीबार सुरु केला. मग आम्हीसुद्धा इकडून गोळ्या झाडल्या यावेळी माझ्या पिस्तुलातूनसुद्धा गोळ्या झाडल्या होत्या असे बावधनकर त्या हल्ल्याच्या घटनेविषयी बोलताना म्हणाले

- Advertisement -

कसाब आणि त्याच्या साथीदारावर गोळ्या झाडल्यानंतर आमचे सहकारी तुकाराम आेंबळे हे पुढे सरसावले पण कसाब जिवंत आहे हे कळताच त्यांनी त्याच्यावर झडप घातली आणि घट्ट पकडले पण कसाबने अचानकपणे त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात तुकाराम आेंबळे जखमी झाले पण कसाबला जेरबंद करण्यात आम्हाला यश आल. दरम्यान तुकाराम आेंबळे यांनी तब्बल दोन तास मृत्यूशी झुंज देत रुग्णालयात प्राण सोडला आणि त शहिद झाले. गोळीबारात अबू इस्माइलचा मृत्यू झाला पण कसाब जखमी झल्याने त्याच्यावर नायर रुग्णालयात उपचार करण्यात आले. अशा कटू आठवणी सांगत बावधनकर यांनी शहिद तुकाराम आेंबळे यांना श्रद्धाजली अर्पण केली. ती काळरात्र होती,ते चित्र खुप भयानक होते. पण योग्य ती कामगिरी करत आम्ही सर्व नियंत्रणात आणले पण त्या घटनेच्या आठवण आजही कालपरवा घडल्यासारखी कायम राहते असे ते म्हणाले. बावधनकर यांना सध्या सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरक्षकपदी कार्यरत असुन योगोयोगाने का होईना त्यांच्यावर सीएसएमटी स्थानकाच्या सुरक्षेची धुरा सोपवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -