घरCORONA UPDATEमुंबईत आज कोरोना लसीकरणाचा तिसरा ड्राय रन

मुंबईत आज कोरोना लसीकरणाचा तिसरा ड्राय रन

Subscribe

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहीमेमुळे रूग्णसंख्या आटोक्यात आली

मुंबईत आज कोरोना लसीकरणाचा तिसरा ड्राय होणार आहे. मुंबईत १६ जानेवारीपासून ९ व्हॅक्सिनेशन सेंटरवर लसीकरण सुरू होणार आहे. लसीकरणासाठी पालिकेने जोरदार तयारी केली आहे. लसीकरण सेंटर्स वाढवण्यासाठी सहा ठिकाणी आज लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात येणार आहे. मुंबईत पाच टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. मुंबईतील रूग्णसंख्या दिवसेंदिवस खूप कमी होऊ लागली आहे.

मुंबईच्या जी उत्तर दादर, माहिम, धरावी विभाग हा कोरोनामुक्त झाला आहे. मुंबईत सद्यपरिस्थितीत केवळ ७ हजार ३९० अक्टिव्ह रूग्ण आहेत. २ हजार ५८१ रूग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. कोरोनाचा हॉट्सपॉट ठरलेली वरळी, धारावी, भायखळासारख्या परिसरात झोपडपट्टी आणि चाळीत एकही कंटेनमेंट झोन शिल्लक राहिलेली नाही.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेमुळे रूग्णसंख्या आटोक्यात आली आहे. १६ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाला सुरूवात होणार आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १०:३० च्या मुहूर्तावर देशात कोरोना लसीकरणाला शुभारंभ करणार आहेत. पहिल्या दिवशी देशात ३ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण केले जाणार आहे.


हेही वाचा – लसीबाबत कोणताही गैरसमज ठेऊ नका – किशोरी पेडणेकर

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -