‘हा’ पूल महापालिकेचाच; अखेर शिक्कामोर्तब

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर पादचारी पूल नक्की कुणाचे ही एकच चर्चा सुरु होती. मात्र या पुलाची जबाबदारी आमचीच असल्याचे महापालिकेने मान्य केल्यामुळे अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

Mumbai
BMC
'हा' पूल महापालिकेचाच; अखेर शिक्कामोर्तब

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन बाहेरील पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून ३४ जण जखमी झाले आहेत. हा पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना झालेल्यानंतर आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले होते. या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची यावरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात टोलवाटोलवी सुरु होती. पण अखेर महापालिकेने हा पूल आमचाच असल्याचे मान्य केले आहे.

रेल्वे आणि महापालिकेची टोलवाटोलवी

पूल कोसळून जीवितहानी ओढवताच पुलाजी जबाबदारी कोणाची, हा वाद चंगला होता. महापालिका आणि रेल्वेने तातडीने या पुलाची जबाबदारी झटकून टाकली होती. या दुर्घटनेनंतर ट्विटरवरुन महापालिका, सरकार आणि रेल्वेची टोलवाटोलवी सुरु झाली. पण अखेर महापालिका अधिकाऱ्यांनी या पुलाची जबाबदारी स्विकारली आहे.

हा आमचाच पूल आहे

शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी या पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट झाले होते. परंतु दुरुस्तीसाठी रेल्वेकडून एनओसीच मिळाली नसल्याचे स्पष्ट करत याची जबाबदारी त्यांनी रेल्वेवर ढकलली होती. अंधेरी पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे आणि महापालिका यांच्यात जबाबदाकीवरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडून टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर सानप यांनी कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता आपली जबाबदारी रेल्वेवर ढकलली होती. मात्र, रेल्वेवर झालेल्या आरोपानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरच्या माध्यामातून, हा पादचारी पूल महापालिकेचाच असल्याचे स्पष्ट केले आहे. अखेर या घटनेनंतर त्यांनी हा पूल महापालिकेचाच असल्यावर शिक्कामोर्तब झाला असून हा आमचाच पूल असल्याचे महापालिकेने देखील मान्य केले आहे.


वाचा – ‘त्या’ पूलाच ऑडिट करण्यात IIT मुंबई, पालिका, रेल्वेचा निष्काळजीपणाच नडला

वाचा – जबाबदारी कोणाची हे निश्चित करा; मुख्यमंत्र्यांचे पालिका आयुक्तांना आदेश


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here