घरमुंबईमुंबईत अवयवदानाची सत्तरी पार

मुंबईत अवयवदानाची सत्तरी पार

Subscribe

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अवयवदानाच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसंच अवयवदानाबाबत समाजात जगजागृती देखील वाढ होत असल्यामुळे जास्त लोकं याचं महत्त्व समजून घेत अवयवदानाचा निर्णय घेत आहेत.

सतत केल्या जाणाऱ्या जनजागृतीमुळे मुंबईत अवयवदानाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसंच, यंदा नोव्हेंबर महिन्यातच मुंबईत अवयवदानाने सत्तरी पार केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी अवयवदानामध्ये तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१८ साली मुंबईत संपूर्ण वर्षभरात ४८ अवयवदान करण्यात झाले होते. बुधवारी नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका ७० वर्षीय वृद्धाच्या कुटुंबियांनी त्याचे यकृत दान करण्यास संमती दिल्याने एकाला जीवदान मिळाले. कुटुंबियांच्या निर्णयामुळे मुंबईतील हे ७२ वे अवयवदान ठरले आहे. या ७० वर्षीय व्यक्तीने यकृत, डोळे आणि त्वचा दान केली आहे. या व्यक्तीचं यकृत नानवटी रूग्णालयातील एका रूग्णाला दान करण्यात आलं आहे. तर, मंगळवारी धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये यकृत, मूत्रपिंड आणि त्वचेचं दान करण्यात आले आहे. हे मुंबईतील ७१ वे अवयवदान होते.

मृताच्या नातेवाईकांनी दिली अवयवदानाची परवानगी

नानावटी हॉस्पिटलमधील अवयवदानाच्या दिलेल्या माहितीप्रमाणे, दात्याला दहा वर्षांपूर्वी स्ट्रोक येऊन गेला होता. पण, दात्याला ४ नोव्हेंबर रोजी बेशुद्धावस्थेत दवाखान्यात नेण्यात आले. दोन दिवस उपचार करूनही प्रकृतीत बदल होत नव्हता. अखेर ६ नोव्हेंबर रोजी या रुग्णाला मेंदूमृत घोषित करण्यात आले. यावेळी मृताच्या नातेवाईकांनी अवयवदानाची परवानगी दिली. त्यानुसार, दान केलेलं यकृत हे एका ४४ वर्षीय पुरुषावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.

- Advertisement -

अवयवदानाबाबत समाजात जनजागृती वाढ

यावर बोलताना यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे डॉ. अंकुर गर्ग म्हणाले की, “दीर्घकाळ दारू सेवनामुळे यकृत खराब होते. पण, दारू न पिणाऱ्यांना यकृताचे आजार होत नसल्याचे गैरसमज आहेत.” अवयवदानाबाबत समाजात जनजागृती वाढत असल्याने अधिकाधिक लोकं याचं महत्त्व समजून घेत अवयवदानाचा निर्णय घेतात.

संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईचा अवयवदानामध्ये प्रथम क्रमांक

याबाबत मुंबईतील विभागीय प्रत्यारोपण समन्वयक केंद्राचे अध्यक्ष डॉ. एक.के माथूर म्हणाले, “गेल्या वर्षी मुंबईमध्ये ४८ अवयवदान पार पडले होते. मात्र, यंदाच्या वर्षी ७२ अवयवदानाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय यावर्षी अजून अवयवदान होतील अशी आम्ही आशा करतो. समन्वयकांचं उत्तम काम आणि समाजात पसरवण्यात आलेली जनजागृती यामुळे हे अवयवदानाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत इतके अवयवदान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यंदाच्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईचा अवयवदानामध्ये प्रथम क्रमांक लागतो.

- Advertisement -

४ नोव्हेंबर रोजी देखील मुंबईत अवयवदान पार पडलं होतं. हे ७१ वं अवयवदान होतं. अंधेरीच्या कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये ६७ वर्षीय व्यक्तीचं अवयवदान करण्यात आलं आहे. यामध्ये लिव्हर, दोन्ही किडनी आणि त्वचा दान करण्यात आली आहेत. या व्यक्तीच्या अवयवदानामुळे तीन लोकांचे प्राण वाचले आहेत.


हेही वाचा – आता मध्यवर्ती खरेदी विभागावर सी.सी.टिव्हीचा वॉच


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -