लालबागचा राजा मंडळाचा मोठा निर्णय; यंदा गणेशोत्सव होणार नाही

Mumbai
lalbaugcha raja
लालबागचा राजा (फाईल फोटो )

दरवर्षी लाखोंच्या संख्येने गणेश भक्त ज्या बाप्पाचे आवर्जून दर्शन घेतात त्या लालबागच्या राजाचा यंदा गणेशोत्सव साजरा होणार नसल्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश मंडळांनी आपापल्या उत्सवात मर्यादा आणली असून लालबागचा राजा मंडळाने थेट गणेशोत्सवच न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ऐवजी यंदा ते आरोग्योत्सव साजरा करणार आहेत. यावेळी ११ ही दिवस रक्तदान शिबिर आणि प्लाझा थेरेपीचे कार्य मंडळाकडून केले जाणार आहे.

गेली ८६ वर्ष लालबाग मार्केटमध्ये लालबागचा राजा विराजमान होतो. १४ फुटी उंच आणि मनमोहक अशी बाप्पांची मुर्ती असते. नवसाला पावणारा म्हणून अनेक गणेशभक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. तसेच लाखोंचे दान, सोन्या चांदीचे दागिने लालबाग राजाच्या चरणी अर्पण केले जातात. अनेक सेलिब्रिटी, उद्योगपती, नेतेमंडळी आणि राजकारणी या लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदाचा ८७ वा गणेशोत्सव मूर्ती स्थापना व विसर्जन असा कोणताही सोहळा साजरा न करिता आरोग्य उत्सव म्हणून श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. लालबागचा राजा हे आमचे श्रद्धा स्थान दैवत आहे. यात कोणतीही शंका असण्याचे कारण नाही पण त्याच्या स्थापना व विसर्जन या बाबीकडे जनता जनार्दन यांची आरोग्य सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्याचा मानस ठेवून जीव वाचवून त्यांच्या शरीरात व हृदयात लालबागचा राजा पाहण्याचे अभूतपूर्व स्वप्न असल्याचे मंडळाच्या वतीने सांगितले जात आहे.

आरोग्य उत्सव म्हणजे काय?

  • महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेने काळजी घ्या असा मजकूर फलक मंडळाने लावला त्यावर चायना वॉर लिहीत पहिला निषेध मंडळाने नोंदवला.
  • रक्ताचा तुटवडा जाणवू लागताच १ हजार ५४६ रक्तदात्यांनी रक्तदान करून मंडळाने पुढाकार घेतला
  • जनता क्लिनिक माध्यमातून ambulance, डॉक्टर मदतीने जनता क्लिनिक दक्षिण मध्य मुंबईत राबविले
    मंडळाचे डायलिसिस् सेवा देखील या काळात सुरू ठेवली
  • आरोग्य उत्सव साजरा करीत असताना प्लाझ्मा थेरपी ला प्राधान्य देवून अधिका अधिक रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प, गलथान खोर्‍यात शहीद झालेल्या जवानां च्या कुटुंबा प्रति योग्य मान सन्मान, तसेच को रो ना रोगाच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस बांधव यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हातभार असे एक ना अनेक संकल्प राबवून सेवा करण्याचा मानस.

हेही वाचा –

मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल रखुमाईची महापूजा; विठ्ठल बडेंना पूजेचा मान

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here