घरताज्या घडामोडीयंदा विद्यापीठाच्या पेट परीक्षेसाठी सर्वाधिक नोंदणी!

यंदा विद्यापीठाच्या पेट परीक्षेसाठी सर्वाधिक नोंदणी!

Subscribe

तब्बल ६८४८ अर्ज प्राप्त, अन्य राज्यातील ५१० विद्यार्थी इच्छूक

मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन पेट  परीक्षेला विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून यावेळी प्रथमच पीएचडी व एमफिल साठी स्वतंत्र अर्ज  स्वीकारण्यात आले. या दोन्ही परीक्षेला संपूर्ण देशातून ६८४८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात इतर २९ राज्यातून ५१० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. पेट परीक्षेसाठी ६५१२ विद्यार्थ्यांनी पीएचडीसाठी तर ३२६ विद्यार्थ्यांनी एमफीलसाठी अर्ज केले आहेत. पेट परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २०१६ च्या निर्देशानुसार  विद्यापीठाने डिसेंबर २०१८ मध्ये पीएचडी व एमफील प्रवेशासाठी प्रथमच ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेतली होती. यानंतर यावर्षीच्या या दुसऱ्या  ऑनलाईन प्रवेश परीक्षेचे अर्ज  २७ फेब्रुवारी ते  ३१ मार्च २०२० पर्यंत स्वीकारण्यात आले होते. यावर्षी प्रथमच पीएचडी व एमफिल या दोन्ही परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज मागविण्यात आले होते. यात पीएचडीसाठी ७८ विषयात तर एमफिलसाठी २५ विषयात ही प्रवेश परीक्षा होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ७ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीएचडीसाठी १५९० अर्ज ठाणे जिल्ह्यातून आले असून त्याखालोखाल मुंबई उपनगर १०७०, मुंबई शहर ९७८, रायगड ५२६, पालघर ४१५, रत्नागिरी १७४ व  सिंधुदुर्ग ८६ असे ४८३९ अर्ज प्राप्त झाले. तसेच महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यातून १२१२ पीएचडीसाठी पुणे जिल्ह्यातुन सर्वाधिक २६६ अर्ज आले आहेत त्याखालोखाल नाशिक १७२, अहमदनगर १००, औरंगाबाद ७१, कोल्हापूर ५९, जळगाव, सांगली व सातारा जिल्ह्यांमधून प्रत्येकी ५०, सोलापूर ४८ , बीड ४३, नांदेड ३७, धुळे ३६, नागपूर ३२, व  बुलढाणा २७ जिल्ह्यांमधून अर्ज प्राप्त झाले आहेत. याव्यतिरिक्त अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, जालना, लातूर या जिल्ह्यातूनही पीएचडीसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत.

- Advertisement -

पीएचडीच्या विद्यार्थी संख्येत ५ % वाढ

२०१६ पासून आजपर्यंत पेट  परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थी संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. २०१६ मध्ये ३३५० तर २०१८ मध्ये ६१६८ इतके विद्यार्थी परीक्षेला बसले. यावर्षी ६५१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ही वाढ मागील वर्षापेक्षा ५ टक्क्यांनी जास्त आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी ६०५१ तर महाराष्ट्राबाहेरील २९ राज्यामधून पीएचडीसाठी ४६१ अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच पीएचडीसाठी एकूण ६५१२ पैकी  २७७३ मुले असून ३७३९ मुली आहेत. या परीक्षेत मुली सर्वाधिक आहेत.

विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत सर्वाधिक अर्ज

पीएचडी अर्जामध्ये सर्वाधिक अर्ज विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत असून यात ३३४० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्याखालोखाल मानव्यविद्या शाखेसाठी १६९१, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेसाठी ११४८, तर आंतरविद्याशाखेसाठी ३३३ अर्ज प्राप्त झाले आहेत.

- Advertisement -

मागील चार वर्षात पीएचडीसाठी नोंदणी

वर्ष नोंदणी

२०१६ – ३३५०

२०१७ – ३७००

२०१८ – ६१६८

२०२० – ६५१२

परराज्यातील विद्यार्थी संख्या

उत्तरप्रदेश 98

पश्चिम बंगाल   ४१

गुजरात  ४०

दिल्ल्ली  ३५

राजस्थान  ३०

आंध्र प्रदेश  २९

केरळ।  २३

हरियाणा  २१

जम्मू काश्मीर १८

अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, नागालँड, बिहार, चंदिगढ, छत्तीसगढ, दादर नगर हवेली, गोवा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश , ओरिसा, पॉण्डेचेरी, पंजाब, सिक्कीम, तामिळनाडू व उत्तरांचल अशा २९ राज्यातून हे अर्ज आले आहेत.

एमफिलसाठी ३२६ अर्ज

यावर्षी प्रथमच एमफिलसाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज मागवले असून यात ३२६ अर्ज आल. महाराष्ट्रातील २७७ विद्यार्थ्यांनी तर राज्याबाहेरील ४९ विद्यार्थ्यानी अर्ज केले आहेत. एमफिलसाठी १५३ मुलांनी तर १७३ मुलींनी अर्ज केले आहेत.यातही मुलींची संख्या जास्त आहे.

पेट परीक्षेसाठी यावर्षी सर्वाधिक अर्ज आलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या असलेले लोकडाऊन संपल्यानंतर पेट ऑनलाईन परीक्षेची तारीख ठरविण्यात येईल. परीक्षा ऑनलाईन असल्याने याचा निकाल तात्काळ जाहीर केला जाईल. म्हणजे विद्यार्थ्यास  विविध संशोधन केंद्रावरील तोंडी परीक्षेनंतर पीएचडी व एमफिलसाठी प्रवेश घेता येईल. – डॉ. विनोद पाटील संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ,  मुंबई विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -