घरमुंबईभारतीय बनावटीच्या मेट्रोची यावर्षी चाचणी

भारतीय बनावटीच्या मेट्रोची यावर्षी चाचणी

Subscribe

एमएमआरडीएची ११०० कोटींची बचत

मुंबईतील एलिव्हेटेड अशा तीन मेट्रो मार्गिकांसाठी जवळपास निम्म्या दरामध्ये मेट्रो ट्रेनचे कोचेस उपलब्ध होणार आहेत. महत्वाच म्हणजे कोचची निर्मिती भारतातच होणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ११०० कोटी रूपयांची बचत होणार आहे. सर्व अद्ययावत सुविधांसह पहिल्या काही मेट्रोच्या ट्रेन या पुढील वर्षभरात चाचणीसाठी उपलब्ध होणार आहे.

एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गिका क्रमांक २ अ( दहिसर ते डी. एन. नगर), २ ब (डी. एन. नगर ते मंडाले / मानखुर्द) आणि मेट्रो मार्गिका क्रमांक ७ (अंधेरी ते दहिसर पूर्व या तिन्ही प्रकल्पासाठी मेट्रोचे ३७८ कोचेसची गरज भासणार आहे. केंद्र शासनाच्या मेक इन इंडिया धोरणाच्या पार्श्वभूमीवरच या कोचेसची निर्मिती भारतात होणार आहे. येत्या वर्षभरात या तिन्ही मेट्रो प्रकल्पासाठी चाचणी सुरू होईल. प्रत्येक यशस्वी चाचणीनंतर दर तीन महिन्यांनी १२ ट्रेन पुरविण्यात येणार आहेत. तब्बल २०० आठवड्यात हे मेट्रोचे कोच आणि ट्रेन पुरविण्याचे काम पुर्ण करण्यात येईल. ’जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान, प्रवाशांची सर्वोच्च सुरक्षा आणि ऊर्जेच्या पुरेपूर वापराची खात्री पुरवणारा हा करार आमच्यासाठी महत्वाचा आहे’, अशी प्रतिक्रिया प्राधिकरणाचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी दिली. प्रत्येक कोचमागे ७.३८ कोटी रूपयांचा कर वगळून हे देशभरातील मेट्रो प्रकल्पाच्या तुलनेत निम्म्या दरात उपलब्ध होणारे असे मेट्रो कोचेस आहेत. या प्रकल्पासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत अर्थसहाय्य करण्यात येत आहे.

- Advertisement -

अत्याधुनिक कोचेस

मेट्रोच्या मार्गिकांसाठी ३७८ कोचेस पुरविण्याचे काम भारत अर्थ मुव्हर्स कंपनीला ३०१५ कोटी रूपयांना देण्यात आले आहे. मेक इन इंडिया धोरणामुळे जवळपास ११०० कोटी रूपयांची बचत होईल. या कंपनीला तांत्रिक स्वरूपाचे सहकार्य हिताची कंपनीकडून करण्यात येणार आहे. सर्वात अत्याधुनिक निकषांसह हे कोचेस तयार केले जाणार आहेत.

फेर्‍यांमध्ये ९० सेकंदाचा फरक

सुरूवातीच्या काळात अनअटेंडेड ट्रेन ऑपरेशन पद्धतीने या मेट्रो चालविण्यात येणार आहेत. दोन गाड्यांच्या फेर्‍यांमध्ये ९० सेकंदाचे अंतर असेल. हे अंतर नियंत्रित आणि देखरेखीसाठी कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.

- Advertisement -

कोचेसचे तंत्रज्ञान

सर्व कोचेस हे आधुनिक स्वरूपाचे, वजनास हलके, ऊर्जा कार्यक्षम आणि वातानुकुलित असणार आहेत. सर्व मेट्रोच्या ट्रेन या चालक – विरहित प्रणालीवर चालवण्यात येणार आहेत. कार्बन विरहित – ऊर्जा निर्मितीक्षम ब्रेक सिस्टिम, ऊर्जेचा किमान वापर, व्यवस्थापनसाठीचा कमी खर्च ही या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये आहेत. शारिरीक अपंगत्व असणार्‍या विशेष व्यक्ती तसेच महिला आणि वरिष्ठ नागरिकांचा प्रवास सुखद व्हावा म्हणून अनेक सुविधायुक्त असे हे कोच परिपूर्ण असणार आहेत. विशेष म्हणजे सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरक्षित बाबींचे नियोजन केले जाणार आहे. रूळांवर आयत्यावेळी अडथळा आल्यास तो अडथळा दूर करणार्‍या यंत्रणेचाही यामध्ये समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -