घरमुंबईसावरकरांना विरोध करणार्‍यांना अंदमनातील तुरुंगात ठेवायला हवे

सावरकरांना विरोध करणार्‍यांना अंदमनातील तुरुंगात ठेवायला हवे

Subscribe

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याला विरोध करणार्‍यांना ज्या तुरुंगात इंग्रजांनी सावरकरांना ठेवले होते. त्याच तुरुंगात पाठवायला हवे. असे केल्याने सावरकर विरोधकांना सावरकरांनी भोगलेल्या हालअपेष्टांची अनुभूती होईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा एकदा काँग्रेसची नाराजी सहन करावी लागणार आहे. कारण सावरकरांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीच विरोध केला आहे.

राज्य विधानसभा निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा नमूद केला आहे. मात्र, पुढे हे दोन पक्ष वेगळे झाले आणि शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन केली.

- Advertisement -

राज्य विधानसभा निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा नमूद केला आहे. मात्र, पुढे हे दोन पक्ष वेगळे झाले आणि शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यानंतर, सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाचा सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध असल्याने हा मुद्दा संशयाच्या भोवर्‍यात सापडला. याचे कारण म्हणजे सावरकर हे इंग्रजांना माफी पत्र धाडणारा नेता असे वर्णन काँग्रेस पक्ष सतत करत आला आहे. या बरोबरच धर्मनिरपेक्षतेबाबत बोलणार्‍या काँग्रेस पक्षाला शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबतही आक्षेप आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -