घरमुंबईहजारो विद्यार्थी प्रवेशाविना

हजारो विद्यार्थी प्रवेशाविना

Subscribe

विधी शाखेच्या प्रवेशप्रक्रियेनंतर शेकडो जागा रिक्त

प्रतिनिधी:-विधी शाखेच्या तृतीय वर्षाची ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेनंतर 535 जागा शिल्लक असूनही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. कॅप राऊंडमध्ये 25 हजार 791 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील अवघ्या 13 हजार 785 विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळाला आहे. मात्र प्रवेशप्रक्रियेनंतर 535 जागा उपलब्ध असूनही प्रवेश बंद केल्याने काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.

जूनमध्ये पार पडलेल्या विधी शाखेच्या सीईटीमध्ये 32 हजार 323 विद्यार्थी पात्र ठरले होते. तर कॅप राऊंडमध्ये 25 हजार 791 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. आतापर्यंत पार पडलेल्या चार प्रवेशफेर्‍यांसाठी 14 हजार 320 जागा उपलब्ध होत्या. यांपैकी 13 हजार 785 म्हणजेच 96 टक्के प्रवेश झाले आहेत. जागा असूनही यापुढे विधीचे प्रवेश होणार नाहीत, असे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा विभागाने जाहीर केले आहे. राज्यात सोलापूर वगळता इतर जिल्ह्यात विधी शाखेच्या जागा शिल्लक आहेत. सोलापूरात उपलब्ध असलेल्या 240 जागा पूर्ण भरल्या आहेत.

- Advertisement -

कॅप राऊंडपूर्वी विधी शाखेचे प्रवेश ऑफलाईनही होतात. पण याची बहुसंख्य विद्यार्थ्यांपर्यंत माहितीच पोहोचलेली नाही. त्यामुळे मेरिट असूनही विद्यार्थी नजीकच्या कॉलेजपासून वंचित राहतात. मेडिकलनंतर विधी शाखेला विद्यार्थ्यांची पसंती मिळत असून जागा रिक्त ठेवण्यापेक्षा कॉलेजस्तरावर मेरिटनुसार त्या भरण्याची सूट दिल्यास शेकडो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, असे स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -