घरमुंबईमोर्फ व्हिडीओ काढून वयोवृद्ध व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी

मोर्फ व्हिडीओ काढून वयोवृद्ध व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी

Subscribe

मोर्फ व्हिडीओ काढून एका वयोवृद्ध व्यावसायिकाकडे 25 कोटी रुपयांची मागणी करत पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता घेण्यासाठी आलेल्या चारजणांच्या एका टोळीला आंबोली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. त्यात एका महिलेचा समावेश असून अटकेनंतर या चौघांनाही शुक्रवारी दुपारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हुसैन हनीफ मकरानी, युवराजसिंग नरेंद्रसिंग चौहाण, रेहमान अब्दुल वाहिद शेख आणि लकी ब्रजकुमार मिश्रा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याच गुन्ह्यात तिघांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून त्यात राहुल शुक्ला, केवलकुमार ऊर्फ अंकल आणि गिरीश शहा यांचा समावेश आहे. यातील हुसैन हा डिस्कव्हरी ऑफ क्राईम चॅनेलचा मालक, युवराज हा भागीदार तर राहुल हा पत्रकार असून ते तिघेही सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले आहे.

मसाज थेरपीस्ट                                                                                                             यातील तक्रारदार अंधेरीतील न्यू लिंक रोडवरील ओबेरॉय स्प्रिंग अपार्टमेटमध्ये राहतात. त्यांचे 68 वर्षांचे वयोवृद्ध वडील बॉलीवूडमध्ये प्रोडेक्शनचे काम करतात.  ते पार्किसन या आजाराने त्रस्त आहेत. त्यावर त्यांचे औषधोपचार सुरु असून त्यांना दररोज मसाज करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पाच महिन्यांपूर्वी त्यांची ओळख लकी मिश्रा या महिलेशी झाली होती. तिने ती लेडी थेरपिस्ट असून उत्कृष्ट मसाज करीत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी तिला त्यांच्या वडिलांच्या मसाजसाठी बोलाविले होते. ऑक्टोबर महिन्यांत ती मसाजसाठी आली होती, यावेळी तिला तिची फी म्हणून तक्रारदारांनी पाच हजार रुपये दिले होते. त्यानंतर ती पुन्हा डिसेंबर महिन्यांत दोन वेळा आली होती.

- Advertisement -

बोगस चॅनलचा मालक                                                                                                         15 जानेवारीला त्यांचे वडिल घरी होते, यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन केला. आपण राहुल शुक्ला बोलत असून डिस्कव्हरी ऑफ क्राईम चॅनेलमधून बोलत असल्याचे सांगून आपल्याकडे तुमचे आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडीओ आहेत. ते व्हिडीओ आमच्या चॅनेलवर प्रकाशित झाल्यास त्यांची बदनामी होईल. यासंदर्भात त्यांच्याशी बोलायचे आहे असे सांगून तो सतत त्यांना कॉलवर धमकी देत होता. असाच एक कॉल त्याने त्यांच्या परिचित व्यक्तीला केला होता. त्यानंतर त्यांनी हुसैन, रेहमान आणि युवराजसिंग यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी त्यांचे लकीसोबत मोर्फ केलेला एक व्हिडीओ दाखविला होता.

महिला प्रमुख आरोपी                                                                                                         त्यात लकीची मुलाखातही त्यांनी त्यांना दाखवून घाबरविण्याचा प्रयत्न केला होता. हा व्हिडीओ प्रकाशित न करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे 25 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती, मात्र इतकी रक्कम देणे शक्य नसल्याने त्यांच्यात 25 लाखांत सौदा पक्का झाला. त्याचा पहिला हप्ता देण्याचे गुरुवारी ठरले होते. ही रक्कम देण्याची तयारी दर्शवून तक्रारदारांनी आंबोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे घडलेला प्रकार सांगितला.गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांच्या पथकाने गुरुवारी रात्री खंडणीचा पहिला हप्ता घेण्यासाठी आलेल्या हुसैन, युवराजसिंग आणि रेहमान या तिघांना अटक केली. या तिघांकडून पोलिसांनी दोन  8 जीबी आणि 16 जीबीचा पेनड्राईव्ह, पाच लाख रुपयांची खंडणीची रक्कम हस्तगत केली. या तिघांच्या चौकशीनंतर सकाळी लकी मिश्रा या महिलेस पोलिसांनी अटक केली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -