एअरटेल गॅलरीतील चोरीप्रकरणी तिघांना अटक

Mumbai
woman arrested by bandra police
पतीसह प्रेयसीला अटक

 सांताक्रुज परिसरातील एका एअरटेल गॅलरीत झालेल्या चोरीप्रकरणी तिघांना सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. अदनान शेख, आफ्ताब शेख आणि गुलाम शेख अशी या तिघांची नावे आहेत. यातील अदनान हा एअरटेल गॅलरीमध्ये कामाला होता. त्यानेच इतर दोन मित्रांच्या मदतीने ही चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 42 हजार रुपयांची कॅश जप्त केली आहे. सांताक्रुज येथे एअरटेलची एक गॅलरी आहे. तिथेच अदनान हा कामाला होता. काही दिवसांपूर्वी या गॅलरीतून एक लाख सहा हजार रुपयांची कॅश चोरी झाली होती.

हा प्रकार उघडकीस येताच क्रिनिता शहा या मॅनेजरने सांताक्रुज पोलिसांत चोरीची तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी गॅलरीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजमध्ये अदनान हा संशयास्पदरित्या कॅश काऊंटरजवळ फिरताना दिसून आला होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने या चोरीची कबुली देताना याकामी त्याला गुलाम आणि आफ्ताब यांनी मदत केल्याचे सांगितले. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आतापर्यंत पोलिसांनी 42 हजार रुपयांची चोरीची कॅश जप्त केली आहे. ते तिघेही अंधेरीतील गावदेवी डोंगरचे रहिवाशी आहे. अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here