घरमुंबईगोरेगाव आग प्रकरणात एकाच गावातील तिघांचा मृत्यू 

गोरेगाव आग प्रकरणात एकाच गावातील तिघांचा मृत्यू 

Subscribe

गोरेगावमधल्या एस. व्ही रोडवरच्या आर. बी. एल बिल्डिंगमधल्या अग्नितांडवात चौघांचा मृत्यू झाला असून यातील तिघे जण एकाच गावातील होते. उत्तरप्रदेशमधील बलरामपूर जिल्ह्यातील शिवपुर गावातील हे तीघांचा या आगीत होरपळून मृत्यू झालाय. नईमुद्दीन शाह (२५), शमसाद शाह (२१), राम अवतार अशी या तिघांची नावे आहेत. दरम्यान नातेवाईंकांना मृतदेहांची ओळख पटली असून या मृतदेहांना त्यांच्या मुळगावी घेऊन जाण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या तिघांच्या मृत्यूमुळे सध्या शिवपुर गावावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

शॉर्टसर्किटमुळे लागली आग

- Advertisement -

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचं सांगण्यात आलं आहे. बिल्डिंगमध्ये ईटी सालट नावाच्या टेली कम्युनिकेशन कंपनीचे ऑफीस रिकामं करण्याचं काम सुरू होतं. तर, गोरेवार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनाजी नलावडे यांनी सांगितलं की, ही कंपनीचं दिवाळं निघालं होतं, शिवाय बँकेकडून कर्ज देखील घेण्यात आलं होतं. प्रकरण हायकोर्टात होतं. त्यानंतर कंपनीने काही संपत्ती विकून बँकेचे कर्ज चुकवण्याचा निर्णय हायकोर्टाने दिला. त्यानुसार जी संपत्ती विकता येऊ शकते, जे सामान बाहेर काढण्याचं काम सुरू झालं. हे काम प्रणाम इंटरप्राईजेसकडे देण्यात आलं.

 

- Advertisement -

कर्मचार्यांना इलेक्ट्रॉनिक कामाचा अनुभव नव्हता

सामान बाहेर काढण्याच्या कामासाठी मालकाने‌ जवळपास १०० कर्मचार्यांची नेमणूक केली. त्यानंतर, १२ मे पासून कंपनीतील सामान हलवण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. पण, नेमण्यात आलेल्या काहीच कर्मचार्यांना इलेक्ट्रॉनिक काम करता येत होती आणि काही कर्मचारी अनुभवी नव्हते. याच दरम्यान शॉर्टसर्किट होऊन आग लागली असावी. ज्यात चौघांचा मृत्यू आणि ९ जण जखमी झाले.

 

३ जणांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान या दूर्घटनेप्रकरणी प्रणाम इंटरप्राईजेसचे मालक नितीन कोठारी आणि दोन कर्मचारी कॉन्ट्रक्टर सलीम मनियार आणि रमजान खान यांच्यावर आयपीसी कलम ३०४ ए आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -