घरमुंबईदुष्काळग्रस्त कुटुंबावर काळाचा घाला

दुष्काळग्रस्त कुटुंबावर काळाचा घाला

Subscribe

झोपेतच असताना अंगावरून टँकरचे चाक गेल्याने तिघांचा अंत

गावाकडील दुष्काळामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत आलेल्या एका कुटुंबावर शनिवारी रात्री काळाने झडप घातली. रस्त्यावर झोपलेल्या या कुटुंबातील तीन सदस्याच्या अंगावरून मॅथेनॉल द्रव्याने भरलेला टँकर गेल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे,यामध्ये ३ वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. या अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने टँकरची तोडफोड करून टँकर पेटवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच अपघातास्थळी धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी पार्कसाईड पोलिसांनी टँकर चालकाला अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टँकर चालकाची रविवारी कोर्टाने जामिनावर सुटका केली आहे.

लक्ष्मीबाई खंडू वाघमारे (५५) ,सायमा साहेबराव पवार (१५) आणि कार्तिक वाघमारे (३) असे या विचित्र अपघातात ठार झालेल्या तिघाची नावे आहेत. या अपघातात खडूं वाघमारे बचावले आहे.मूळचे नांदेड जिल्ह्यातील खंदार येथे राहणारे वाघमारे आणि पवार या दोन कुटुंबातील १० ते १२ सदस्य काही महिन्यापूर्वी गावाहून मुंबईत पोटाची खळगी भरण्यासाठी आले होते. गावी दुष्काळामुळे हाताला काम नसल्यामुळे कुटुंबाची होणार्‍या उपासमारीमुळे मुंबईत रोजगार मिळवण्यासाठी आलेले होते. हे कुटुंब विक्रोळी पूर्व येथील पवई रोड वरील कैलास कॉम्प्लेक्स येथील फुटपाथवर झोपड बनवून राहत होते.

- Advertisement -

शनिवारी रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी त्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थने भरलेला टँकर पार्क करतेवेळी चालकांचे नियंत्रण सुटून टँकरने पुढे उभा असलेल्या दुसर्‍या टँकरला धडक दिली. या टँकरचे चाक रस्त्यावर झोलेल्या वाघमारे कुटुंबाच्या तीन जणांच्या तिघेही अक्षरश चिरडले गेले. स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या तिघांना टँकर घालून बाहेर काढून उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आणले असता डॉक्टरांनी तिघांना तपासून मृत घोषित केले.

या अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने टँकरची तोडफोड करून टँकर पेटवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच
अपघातास्थळी धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी पार्क साईड पोलिसांनी टँकर चालक अशोक साहू (३२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक कऱण्यात आली होती, रविवारी सुट्टीच्या न्यायालयाने त्याला १५ हजार रुपयांच्या जामिनावर सोडले. दरम्यान रविवारी दुपारी तिन्हीही मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले असून हे तिन्ही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नांदेड येथील खंदार येथे नेण्यात आले आहे.

- Advertisement -

कैलास कॉम्प्लेक्स, पवई रोड या ठिकाणी वाहनासाठी अधिकृत पार्किंग नसून देखील टँकर चालक या ठिकाणी ज्वलनशील द्रव्याने भरलेले टँकर राजरोसपणे उभे करतात. या टँकरमध्ये पेट्रोल, डिझेल, मॅथेनॉल इत्यादी ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता स्थनिक नागरिकांनी वर्तवली आहे.
बॉक्स

अपघातात मृत्यू झालली सायमा पवार खडूं वाघमारे यांच्या मुलीची मुलगी होती. सायमा हिचे आईवडील घाटकोपर येथे राहत होते, ती आईवडिलांसोबत राहत होती. शनिवारी सायंकाळी ती आईसोबत भांडण करून आजी आजोबांकडे आली होती. आजोबाने तिला परत जाण्यास सांगितले होते परंतु स्क्ली जाईल असे बोलून ती शनिवारी रात्री आजीआजोबाकडे मुक्कामाला थांबली होती. माझ्यासोबत भांडण नसते झाले तर तर माझी लेक माझ्यासोबत असती, मृत्यूनेच तिला तिथे बोलावून घेतले असे सायमाची आई रडून रडून नातेवाईकांना सांगता होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -