Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी वर्षाच्या पहिल्याच दिवशी NCBची धाड, तीन पेडलर्सला अटक

वर्षाच्या पहिल्याच दिवशी NCBची धाड, तीन पेडलर्सला अटक

Related Story

- Advertisement -

आज नवं वर्षातला पहिलाच दिवस. बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यापासून NCB जास्त सक्रिय असल्याचं दिसून आलं. आता नव वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून NCB पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागली आहे. NCBने आज मुंबईतल्या दोन ठिकाणी छापेमारी केली आहे. अंधेरी आणि कुर्ला या मुंबईतल्या दोन ठिकाणी NCBने छापा टाकून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज हस्तगत केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी एकूण तीन ड्रग्ज पेडलर्सला अटक करण्यात आली असून आज त्यांना कोर्टात हजर करणार आहेत.

- Advertisement -

मुंबई पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाने (NCB) नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी कारवाई करण्यात आली आहे. बांद्रा युनिट ने ५२ लाख रुपये किंमतीचे २०४ ग्रॅम कोकेन ड्रग्ज जप्त केला असून एका नायजिरिअन आरोपीला अटक केली आहे. नॅनो कारमध्ये ड्रग्ज घेऊन आला होता हा आरोपी वाकोला सांताक्रुज पूर्व मध्ये पोलिसांना बघून पळून जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी त्याला अटक केली.


हेही वाचा –  वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सहा राज्यांमध्ये ‘लाईट हाउस प्रोजेक्ट’ची पायाभरणी करणार


- Advertisement -

 

- Advertisement -