घरमुंबईसीएनजी सिलेंडरच्या टेस्टिंग दरम्यान आग; तीन कामगार जखमी

सीएनजी सिलेंडरच्या टेस्टिंग दरम्यान आग; तीन कामगार जखमी

Subscribe

सीएनडी सिलेंडरमधील गॅस टेस्टिंगचे काम सुरु होते. अचानक सिलेंडरच्या नोजलमधून गॅस बाहेर येऊन आग लागली. या आगीमध्ये तीन कामगार जखमी झाले.

विक्रोळीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षातल्या सीएनजी गॅसची टेस्टिंग करताना गॅस गळती झाली. गॅस बाहेर आल्याने आग लागली आणि तीन कामगार जखमी झाले. विक्रोळीच्या कन्नमवारनगरमध्ये ही घटना घडली आहे. ओंकार सीएनजी सिलेंडर हायड्रो टेस्टिंग केंद्रामध्ये हा प्रकार घडला आहे. सीएनडी सिलेंडरमधील गॅस टेस्टिंगचे काम सुरु होते. अचानक सिलेंडरच्या नोजलमधून गॅस बाहेर येऊन आग लागली. या आगीमध्ये तीन जण जखमी झाले. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अशी घडली घटना

विक्रोळीच्या कन्नमवारनगरमध्ये ओमकार गॅरेज या सीएनजी टेस्टिंग केंद्रात आग लागून ३ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. सीएनजीचा सिलेंडर भरताना गॅस लिक होऊन आग लागली. या आगीत तिन्ही कामगार भाजले आहेत. त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारास दाखल केले आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -