घरमुंबईएसी लिक्वीड अंगावर पडून तिघे जखमी

एसी लिक्वीड अंगावर पडून तिघे जखमी

Subscribe

पनवेल लोकलमध्ये शुक्रवारची घटना

माहिम- किंग्जसर्कल रेल्वे स्थानकादरम्यान शुक्रवारी सकाळी लोकलच्या डब्यात एसी गॅसच्या लिक्वीडची बाटली फुटून त्यातील लिक्वीड अंगावर पडल्याने तीन प्रवासी जखमी झाले. याप्रकरणी वडाळा लोहमार्ग पोलिसांनी एका प्रवाशाविरेाधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनेमुळे लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शुक्रवारी सकाळी अंधेरी रेल्वे स्थानकावरून नऊ वाजता पनवेलला जाणारी लोकल निघाली होती. ही गाडी वांद्रे रेल्वे स्थानकात येताच मोहम्मद आरश्ल हा प्रवासी गाडीत चढला. गर्दीची वेळ असल्यामुळे गाडीत गर्दी होती. मोहम्मदकडे एक पिशवी होती. त्यात एसी गॅसच्या लिक्वीडची बाटली होती. जेव्हा तो गाडीत चढला तेव्हा त्यांच्या हाता असलेल्या पिशवीतून आवाज आणि धूर येत होता. सहप्रवाशांनी मोहम्मदला त्याबद्दल विचारले असता त्याने एसी गॅसचे लिक्वीडची बाटली असल्याचे सांगितले. त्यावर प्रवाशांनी मोहम्मदला ती बाटली फेकून देण्यास सांगितले.

- Advertisement -

मात्र त्याने कोणाचे ऐकले नाही. ती लोकल माहिम ते किंग्जसर्कल दरम्यान आली असता मोहम्मदच्या पिशवातील बाटली फुटून मोठा आवाज झाला. त्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती. बाटली फुटताच संपूर्ण लिक्वीडच मोहम्मद आणि दोन सहप्रवाशांच्या अंगावर उडाल्याने ते जखमी झाले. या जखमी झालेल्या इतर प्रवाशांचे नाव शिवसागर पाठक (48)आणि शिवा द्वीवेदी (38) असे आहे. या घटनेमुळे रेल्वे प्र्रवाशांच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहेे.

रेल्वे नियमांचे सर्रास उल्लंघन
रेल्वे प्रवासात प्रवासी ज्वालाग्रही पदार्थ घेऊन प्रवास करताना आढळल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक हजार रुपयाच्या दंड वसूूल केला जातो. मात्र रेल्वे पोलिसांकडून यासंबंधी तपास अभियान राबवण्यात येत नाही. त्यामुळे असे ज्वालाग्रही पदार्थ घेऊन प्रवास करताना रेल्वे पोलिसांचा धाक प्रवाशांना राहिलेला नाही. रॉकेल, पेट्रोल, केरोसीन, तेल, रंग घेऊन अनेकजण प्रवास करतात पण त्यांची तपासणी होत नाही.

- Advertisement -

या दुर्घटनेमध्ये आरोपीसह दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांना जे.जे.हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास केला असता आरोपी मोहम्मद आरश्ल हा एका बाटलीतून एसी गॅसचे लिक्वीड घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.
– राजेंद्र पाल वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वडाळा लोहमार्ग पोलीस.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -