घरमुंबईगणेशविसर्जनात तिघांचा मृत्यू, ४४ जण जखमी

गणेशविसर्जनात तिघांचा मृत्यू, ४४ जण जखमी

Subscribe

अनंतचतुर्दशी दिवशी बाप्पाच्या विसर्जनावेळी मुंबईतील विविध विसर्जन स्थळी एकूण ४४ जण जखमी झाले आहेत. तर, तिघांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : दहा दिवसाच्या पाहुणचारानंतर गणपतीबाप्पाचे रविवारी विसर्जन करण्यात आले. या गणेशविसर्जनला मुंबईमध्ये गालबोट लागले आहे. अनंतचतुर्दशी दिवशी बाप्पाच्या विसर्जनावेळी मुंबईतील विविध विसर्जन स्थळी एकूण ४४ जण जखमी झाले आहेत. तर, तिघांचा मृत्यू झाला आहे.

एकूण जखमी – ४४
राजावाडी रुग्णालय – २२
कांदिवली हॉस्पिटल – १७
नायर रुग्णालय – ५

भांडूपच्या भांडूपेश्वर तलावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणपतींचे विसर्जन होत असते. यंदाच्या वर्षी देखील याठिकाणी अनेक गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. मात्र या विसर्जना दरम्यान एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यज्ञेश मळेकर असे या मृत तरुणाचे नाव आहे. यज्ञेश इतर सहकार्‍यांसह रात्री २ च्या दरम्यान तलावात गणपती विसर्जनासाठी उतरला होता. गणपती विसर्जन करण्यासाठी तराफावरुन तलावाच्या मध्यभागी जात असताना अचानक यज्ञेश तलावात पडला. १४ फुटांपेक्षा खोल असलेल्या या तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला. हा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. स्थानिकांनी त्याला बाहेर काढले आणि मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात उपचारास दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या घटनेनंतर यज्ञेश परिसरामध्ये राहायला होता त्याठिकाणी शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

तर , काजूपाडा येथे एकाचा विसर्जन मिरवणूकीत नाचताना मृत्ये झाला असल्याचे समोर आले आहे. अमित वर्मा असें त्यांचे नाव आहे. तसेच, वेगवेगळ्या ठिकाणी ४४ जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार करुन घरी सोडण्यात आले. मानखुर्दच्या ५९ वर्षीय वसंत किरवले यांचा ही ह्रदय विकाराने मृत्यू झाला आहे. किरवले यांना चेंबूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण, त्यांना मृत घोषित केले.

गिरगाव चौपाटीवर बोट उलटली

गिरगाव चौपाटीवर विसर्जनाला जात असताना बोट बुडाल्याची घटना सोमवारी घडली. यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या घटनेत ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, गिरगाव चौपाटीवरील बोट दुर्घटनेतील जखमींवर रुग्णालयात सुरू आहेत. यात १ महिला, २ पुरुष आणि एक मुलगा होता.

- Advertisement -

मुर्ती कोसळण्याच्या घटना

कांदिवली चारकोप येथे गणपती विसर्जना दरम्यान क्रेन पडून १७ जण जखमी झाले. या जखमींवर एस.एम.टी. पाटील स्टाफ नर्स ऑस्कर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर, पवईमध्ये गणपती विसर्जना दरम्यान क्रेनमधून गणपती बाप्पाची मूर्ती अंगावर पडून २ जण जखमी झाले. त्यांच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या जखमींची नावे युसुफ शेख आणि सागर चंडेलिया अशी आहेत. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. राजावाडी रुग्णालयात एकूण २२ जणांना विविध कारणांनी दाखल करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -