घरमुंबईहिरे व्यापारी हत्याकांड प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक

हिरे व्यापारी हत्याकांड प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक

Subscribe

हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी आणखी तिघांना अटक केली असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे.

हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी आणखी तिघांना अटक केली असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. या हत्याकांडात आतापर्यंत सहा जणांना अटक झाली आहे. मंगळवारी अटक करण्यात आलेल्या तीघांपैकी एक मॉडेल असल्याचे समजते, उदानीला हनीट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी तीचा वापर करण्यात येणार होता. निखत खान (२०),शाईस्ता खान(४१)आणि महेश भोईर असे मंगळवारी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या गुन्ह्यात आतापर्यंत सहा जणांना अटक झाली असून यापूर्वी भाजपाचे मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी स्वीय सहाय्यक सचिन पवार, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पवार आणि प्रणीत भोईर यांना अटक करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण

हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांची हत्या न करता त्यांना हनीट्रॅप मध्ये अडकवून त्यांचा अश्लील व्हिडीओ बनवून त्या मार्फत उदानी यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा कट सचिन आणि दिनेश यांचा होता. या दोघांनी मिळून हा कट महिन्याभरापूर्वी शिजवला होता. हा कट तडीस नेण्याची जबाबदारी दिनेश यांच्यावर सोपविण्यात आली होती, मोबदल्यात त्याला मोठी रक्कम मिळणार होती. उदानीला ‘हनीट्रॅप’ मध्ये अडकवण्यासाठी शाईस्ता खान मध्यस्थीने निखत खानचा वापर करण्यात येणार होता,या बदल्यात निखतला हिंदी मालिकेत भूमिका देण्याचे कबूल करण्यात आले होते अशी माहिती समोर येत आहे. मात्र या कटाचा ‘हनीट्रॅप’ वाटेतच फसला आणि उदाणीसोबत झालेल्या झटापटीत उदानी यांची हत्या झाली. त्या नंतर उदानी यांच्या मृत्यूदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मोटारीचा चालक प्रणीत भोईर याने आपला चुलत भाऊ महेश भोईर याची मदत घेऊन मृतदेह पनवेल तालुक्यातील नेरवाडीच्या जंगलात टाकण्यात आला. उदानी यांच्या हत्यानंतर त्यांच्या अंगावर असलेले लाखो रुपयांचे दागिने, रोकड,मोबाईल फोन्स काढून घेण्यात आले.

- Advertisement -

दागिन्यांचा शोध

हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांना दागिने घालण्याचा शौक होता, त्यांच्या शरीरावर सोन्याचे दागिने तसेच हिरेजडित अंगठ्या,महागडे घड्याळ नेहमी असायचे.ज्या दिवशी उदानीयांची हत्या झाली त्या दिवशी ही त्यांच्या गळ्यात सोन्याचा लॉकेटसह सोन्याची चैन, हिरेजडित अंगठी आणि रोकड होती. पनवेल तालुका पोलिसांना नरेवाडी जंगलात उदानी यांचा मृतदेह मिळून आला तुला वेळी त्यांच्या शरीरावर एकही दागिना अथवा रोकड मिळून आली नाही, तसेच त्यांचे दोन्ही मोबाईल फोन देखील पोलिसांना मिळून आलेले नाही. हे दागिने रोकड आणि मोबाईल नक्की कुणाकडे आहे, त्याचे काय करण्यात आले, याच पंतनगर शोध घेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -