घरमुंबई२१ वर्षांच्या मुलाच्या अवयवदानाने वाचवले तिघांचे प्राण

२१ वर्षांच्या मुलाच्या अवयवदानाने वाचवले तिघांचे प्राण

Subscribe

मुंबईतील सतत होणाऱ्या अवयवदानाच्या जनजागृतीमुळे सध्या मुंबईचा अवयवदानामध्ये प्रथम क्रमांक आहे. या अवयवदानामुळे तिघांचा जीव वाचवण्यात मदत झाली आहे.

नवी मुंबईतील वाशी हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये ७३ व्या अवयवदानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत होणाऱ्या सततच्या जनजागृतीमुळे सध्या मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्रातून आता अवयवदानासाठी पुढाकार घेतला जात आहे. त्यानुसार, बालदिनाच्या दिवशी एका बापाने आपल्या मुलाला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर त्याचे अवदान करण्याचा निर्णय घेतला. वडीलांनी घेतलेल्या या निर्णयामुळे तिघांचा जीव वाचवण्यात मदत झाली आहे.

वडिलांनी केलं मुलाचं अवयवदान 

या मुलाचे किडनी, यकृत, कॉर्निया आणि हाडं हे अवयव दान करण्यात आले आहेत. यामुळे तीन जणांना नव्याने आयुष्य मिळण्यास मदत झाली आहे. काही दिवसांपूर्वी या २१ वर्षीय तरुणाचा रस्ते अपघात झाला होता. या तरुणाला तातडीने वाशीच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण, ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे या रुग्णाला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलं. या तरुणाच्या कुटुंबियांना अवयवदानाबाबत माहिती असल्याने त्यांनी मुलाचे अवयव दान करण्यास परवानगी दिली.

- Advertisement -

या रुग्णाची एक किडनी हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये एका १९ वर्षीय मुलाला देण्यात आली आहे. कॉर्निया नेत्रपेढीत तर हाडं बोन बँकमध्ये दान केली आहेत. याशिवाय, लिव्हर आणि एक किडनी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे.

याविषयी माहिती देताना वाशीच्या हिरानंदानी हॉस्पिटलमधील फॅक्लटी डिरेक्टर संदीप गुदूरू यांनी सांगितलं, “आमच्याकडे आतापर्यंत ५ अवयवदान तर ४ लिविंग डोनरद्वारे यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. लोकं अवयवदानासाठी पुढाकार घेत आहेत ही गोष्ट चांगली आहे. याशिवाय वडिलांनी मुलाचं अवयवदान केल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.”

- Advertisement -

मुंबईचा अवयवदानामध्ये प्रथम क्रमांक

याबाबत मुंबईतील विभागीय प्रत्यारोपण समन्वयक केंद्राचे अध्यक्ष डॉ. एक. के माथूर म्हणाले, “गेल्या वर्षी मुंबईमध्ये ४८ अवयवदान पार पडले होते. पण, यंदाच्या वर्षी ७३ अवयवदानाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईचा अवयवदानामध्ये प्रथम क्रमांक लागतो.”


हेही वाचा – सावधान… ठाणे, कल्याणात डेंग्यू हातपाय पसरतोय!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -