घरमुंबईदेहविक्री प्रकरणी तिघांना अटक

देहविक्री प्रकरणी तिघांना अटक

Subscribe

देहविक्रीच्या व्यवसायाचतून दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

पश्चिम बंगाल येथुन मुंबईतील कुटनखान्यात विक्रीसाठी आणण्यात आलेल्या दोन तरुणीची व्ही.पी. रोड पोलिसांनी सुटका केली आहे, या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई शुक्रवारी रात्री गिरगाव येथे करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या या त्रिकुटाने या पूर्वी अनेक तरुणींची विक्री केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कुंटणखान्यात होत होती विक्री

सद्दाम समषेर लष्कर (२२), गोपाल पोताम मायती (२८), देव अमरसिंग मंडल, (३१) असे अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाचे नावे आहेत. या पैकी दोघेजण पश्चिम बंगाल येथे राहणारे असून एक जण दिल्ली येथे राहणारा आहे. शुक्रवारी रात्री गिरगाव, पी. बी रोड या मुलीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती व्ही.पी.रोड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सदर ठकाणी येऊन या त्रिकुटांच्या तावडीतून दोन तरुणीची सुटका केली करून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या तरुणीकडे चौकशी केल्या असता अटक करण्यात आलेल्या तिघांनी पश्चिम बंगाल येथून नोकरी देण्याच्या बहाण्याने मुंबईत आणले होते. व या ठिकाणी आमची कुंटणखान्यात विक्री करण्यात येत होती अशी माहिती या दोघीनी पोलिसांना दिली.

- Advertisement -

पिटा कायद्याअंतर्गत केले अटक

पोलिसांनी या तिघांविरुद्ध पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या या त्रिकुटाने या पूर्वी देखील अनेक मुलींना फसवुन मुंबईत आणून त्यांची कुंटणखान्यात विक्री केली असण्याची शक्यता असून या अनुषंगाने तपास सुरु आहे. या त्रिकुटांच्या तावडीतून सुटका करण्यात आलेल्या तरुणींनाची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -