घरमुंबईआंदोलनादरम्यान वनअधिकाऱ्यांवर फेकली राख

आंदोलनादरम्यान वनअधिकाऱ्यांवर फेकली राख

Subscribe

ठाणे येथील कोपरी परिसरात झाडांना लागलेल्या आगीच्या घटनेनंतर आज वनविभागावर मोर्चा काढण्यात आला. वनअधिकाऱ्यांच्या बेजबाबदारीमुळे येथे आगीच्या घटना सतत होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केले. आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांवर राख फेकण्यात आली.

ठाण्यातील कोपरी परिसरात झाडांना लागलेल्या आगीचा निषेध शिवसेनेने केला आहे. यासाठी आज ठाण्यातील नौपाडा परिसरातील वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनादरम्यान आदोलकांनी वनअधिकाऱ्यांनवर झाडांचा राख फेकून निषेध केला. कोपरी परिसराता झाडांना लागलेली आग हा वणवा नसून ती आग लावण्यात आली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या घटनेला जवाबदार अशलेले वन सरक्षक अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असे लेखी आश्वासनाची मागणी करण्यात आली. दोन वर्षापूर्वी १५ हजारहून अधिक लोकांनी एकत्र येऊन श्रीमंगलम परिसरात ओसाड टेकड्यांवर झाडे लावली होती. मात्र पण वनविभागाचे लक्ष नसल्यामुळे समाजकंटकांकडून या झाडांना वारंवार आगी लावल्या गेली असल्याचे आंदोलनकांनी सांगितले. याचाच उद्रेक्ष म्हणून शिनवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी वनअधिकारी शेळके आणि रामगावकर यांच्यावर कारवाईची मागणी शिंदे यांनी केली.

- Advertisement -

काय म्हणाले खासदार शिंदे

“ठाण्यातील कोपरी परिसरात मोठ्या संख्यने झाडे लावण्यात आली होती. या झाडांमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात  ऑक्सीजन निर्माण होतो. मात्र या झाडांना नष्ट करण्याचे काम काही समजा कंटकांकडून केलं जात आहे. वन खात्याचे लक्ष नसल्यामुळे येथील झाडे पेटवली जातात. याला वणव्याचे नाव दिले जाते. अशा प्रकारच्या घटना थांबल्या नाहीत तर लवकरच मुंबईचे दिल्ली होईल. वन अधिकाऱ्यांचा सतत पाठपूरवठा करून देखील या ठिकाणचे गवत कापल्या गेले नाही. यामुळे या परिसरात आग लागण्याच्या घटना होतात. त्यामुळे येथील लोकांचा उद्रेक आज समोर आला. म्हणून लोकांनी झाडांची राख वन अधिकाऱ्यांवर फेकली. अशा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवााई व्हावी आणि त्याचे लेखी आश्वासन आम्हाला वन खात्याने द्यावे.”- खासदार श्रीकांत शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -