घरमुंबईउल्हासनगरमधील ११ व्यापाऱ्यांना फसवून भामटे फरार

उल्हासनगरमधील ११ व्यापाऱ्यांना फसवून भामटे फरार

Subscribe

उल्हासनगरमधील ११ व्यापाऱ्यांकडून ६४ लाख ८६ हजार रुपये किंमतीचे कपडे उधारीवर घेणाऱ्या पुण्यातील भामटे फसवून फरार झाले असल्याचा प्रकार समोर आला आहे.

उल्हासनगरमधील ११ रेडिमेड गारमेंटच्या व्यापाऱ्यांकडून पुण्याच्या दोन व्यापाऱ्यांनी ६४ लाख ८६ हजार रुपये किंमतीचे कपडे उधारीवर घेतले होते. मात्र, चेक देऊन त्यांनी आपले बँक खाते आणि दुकान देखील बंद केले आहे. या प्रकरणी त्या ११ रेडिमेड गारमेंटच्या व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता त्या दोन जणांविरुद्ध पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापारांना फसवून भामटे फरार

रेडिमेड कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या उल्हासनगर शहरात देशभरातुन अनेक व्यापारी कपडे खरेदी करण्यासाठी येत असतात. या व्यापारात करोडो रुपयांची उलाढाल होत असते. अनेक व्यवहार हे एकमेकांवर विश्वास ठेवून उधारीवर केले जातात, नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेऊन पुण्याचे दोन भामटे सुजय कन्हैयालाल शर्मा (२३) आणि कमलेश जैन (३५) यांनी घेतला आहे. या दोन भामट्यांचे बुधवार पेठ, पुणे येथे विनायका टेक्स्टाईल नावाचे कार्यालय आहे. शर्मा आणि जैन यांनी उल्हासनगरमधील एकूण ११ विविध दुकानदारांकडून २०१८ ते २०१९ च्या दरम्यान ६४ लाख ८६ हजार रुपये किंमतीचे रेडिमेड कपडे उधारीवर घेतले होते. या व्यवहारात दुकानदारांना विविध चेक दिले होते. परंतु हे चेक दिलेल्या मुदतीत वटू नये म्हणून त्यांनी त्यांचे बँक अकाउंट बंद केले आणि कार्यालय देखील बंद केले आहे. तसेच या दोन आरोपींनी त्यांचे मोबाईल फोन देखील बंद केले आहेत. उल्हासनगर मधील व्यापाऱ्यांची या प्रकरणात आपसात चर्चा झाल्यानंतर एकूण ११ व्यापाऱ्यांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

- Advertisement -

गुन्हेगारांच्या विरोधात तक्रार नोंद

फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांतर्फे दीपक खुबचंद बिजलानी (२९) यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपी सुजय कन्हैयालाल शर्मा आणि कमलेश जैन यांच्याविरोधात तक्रार नोंदवली असता पोलिसांनी भा द वी ४२०,४०६, ३४, अनव्ये गुन्हा दाखल केला आहे .या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. तडाखे घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -