…तोर्यंत मातोश्रीच्या परिसरात पाणी तुंबणारच

नाले रुंदीकरणाचे काम रखडल्याने यंदाच्या पावसात मातोश्री परिसर जलमय होण्याची शक्यता आहे.

Mumbai
waterlogged kalanagar
जलमय कलानगर परिसर

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थित पर्जन्य जलविभागाच्या अभियंत्याला झालेल्या मारहाणीला कारणीभूत ठरलेल्या कलानगर जंक्शन नाल्याचे काम आतापर्यंत ६० टक्के पूर्ण झाले आहे. परंतु एका बाजूला पश्चिम उपनगराला गॅसचा पुरवठा करणारी गॅस वाहिनी आणि दुसर्‍याबाजूल १४०० मि.मी व्यासाची जलवाहिनी जोपर्यंत हटवल्या जात नाही, तोपर्यंत या नाल्याचे काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे दोन भागांमध्ये केल्या जाणार्‍या या नाल्यांपैकी ३मीटर रुंदीचे काम यामुळे रखडले आहे. खुद्द मेट्रोच्या कामांमध्येही या नाल्याचा अडथळा असल्याने त्यांनाही याचे रुंदीकरण करायचे आहे. त्यामुळे जोपर्यंत ही कामे होत नाहीत, तोपर्यंत मातोश्री परिरासत पाणी तुंबणारच असे बोलले जात आहे.

गॅसवाहिनी आणि जलवाहिनीचा अडथळा

पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या कलानगर जंक्शन ते नंदादीप कल्व्हर्ट पर्यंतच्या रस्त्यालगतच्या पावसाळी पाणी वाहून नेणार्‍या वाहिन्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ओएनजीएसी ते खेरवाडीपर्यंत पश्चिम द्रुतगती महामार्गाशेजारी हा नाला जात आहे. हा नाला ओएनजीसीजवळ ८ मीटर रुंदीचा आहे. परंतू पुढे खेरवाडीपर्यंत हा नाला अडीच ते चार मीटर एवढाच रुंद आहे. त्यामुळे या नाल्यातील बॉटलनेक काढण्यासाठीचा प्रस्ताव बनवण्यात आला असून त्यानुसार त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार नाल्याचे रुंदीकरण ४ मीटर व ३ मीटर अशाप्रकारे दोन भागांमध्ये केले जात आहे. त्यातील ४ मीटर रुंदीचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत महापालिकेने नेमलेल्या कंत्राटदाराने ६० टक्के काम पूर्ण केले आहे. उर्वरीत ३मीटर रुंदीचे काम हे पश्चिम उपनगराला गॅसचा पुरवठा करणारी गॅस वाहिनी व मुंबईकरांना पाण्याचा पुरवठा करणारी १४०० मि.मी व्यासाची जलवाहिनी यामुळे अडले असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून समजते.

सखल भागातील पाण्याच्या निचऱ्यासाठी पंप बसविणार

हे काम पूर्ण व्हावे म्हणून अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी गॅस कंपनीसोबत तीन वेळा बैठका घेतल्या आहेत. खुद्द सिंघल यासाठी प्रयत्नशील आहेत. नाल्याचे कामच अर्धवट असल्याने त्याचा पूर्ण परिणाम दिसून येणार नाही. मात्र, नाल्याच्या बाजूला उंचवटा होऊन रस्त्यांच्या बाजूला सखल भाग झाल्याने काही प्रमाणात पाणी तुंबले जाते. हेच पाणी मुख्य रस्त्यावर येऊन जमा होते. परंतू यावर उपाय म्हणून दोन पंप लावले जात असून त्यामुळे पाण्याचा निचरा १५ ते २० मिनिटांमध्ये झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तांत्रिक कारणांची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, विभागप्रमुख अ‍ॅड. अनिल परब यांना देण्यात आली आहे. परंतू महापौरांची जीभ का घसरली याबाबतच अधिकारी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी याबाबत स्पष्ट करताना असे म्हटले की, ”महापालिकेने तो नाला बंदिस्त केला आहे. पण चांगले काम केले आहे. काम पूर्णपणे झोलेले नाही, आतापर्यंत पाच मीटरचे काम झाले आहे. तर अजून ४ मीटरचे व्हायचे आहे. परंतू तिथे पाणी साचत असल्याच्या तक्रारी आल्याने आपण त्या नाल्याची पाहणी करायला गेलो होतो. बेहराम पाडा येथे अदानीच्या केबल्स वाहिन्या टाकण्याचे काम बाकी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here