घरमुंबई४१ वर्षीय रुग्णावर थ्रीडी प्रिंटेड टायटॅनियम कवटी प्रत्यारोपण

४१ वर्षीय रुग्णावर थ्रीडी प्रिंटेड टायटॅनियम कवटी प्रत्यारोपण

Subscribe

अपोलो हॉस्पिटलमध्ये ४१ वर्षीय रुग्णावर थ्रीडी प्रिंटेड टायटॅनियम कवटी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे.

अपोलो हॉस्पिटलमध्ये काही महिन्यांपूर्वी कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेले प्रशांत देसाई हे आता एक सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत. ४१ वर्षीय प्रशांत देसाई यांचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्यावर कवटी प्रत्यारोपण करणे गरजेचे होते. त्यानुसार, मुंबईत पहिल्यांदाच थ्रीडी प्रिंटेड टायटॅनियम कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रशांत देसाई यांना अपघातात कवटी, डोक्याचा पुढील भाग, नाक, डाव्या सुप्राऑर्बिटल रिजचला खूप दुखापत झाली होती. पण, त्यांच्यावर झालेल्या प्रत्यारोपणामुळे त्यांना जीवदान मिळाले. पण, मेंदू संपूर्णपणे बरा होण्यासाठी बरेच महिने दिल्यानंतर क्रॅनिओप्लास्टी करण्यात आलीरुग्णाचा चेहराडोके जितके शक्य होईल तितके सर्वसामान्य दिसावा यासाठीही डॉक्टरांनी प्रयत्न केले. ९ जानेवारी, २०१९ ला देसाईंवर थ्रीडी प्रिंटेड टायटॅनियम प्रत्यारोपणासहित क्रॅनिओप्लास्टी करण्यात आली आणि तीन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. देसाई यांना पूर्णपणे बरं होण्यासाठी आणखी काही वर्षे लागतील पण, आता ते सर्वसामान्य जीवन जगत असल्याचा आनंद डॉक्टर व्यक्त करतात.

या रुग्णाला रस्त्यावर झालेल्या एका अपघातात सप्टेंबर २०१८ ला कवटी आणि मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मेंदूला जबर दुखापत झाल्यामुळे सेरेब्रोस्पिनल फ्लुइड कान आणि नाकातून वाहत होते. त्यामुळे त्यांच्या कवटीला फ्रॅक्चर आणि मेंदूच्या आजूबाजूच्या पेशींचे भरपूर नुकसान झाल्याचे समजत होते. अशा पद्धतीच्या अपघातात व्यक्तीचा जीव वाचवणे खूपच जिकिरीचे काम असते – डॉ. सुनील कुट्टी, अपोलो हॉस्पिटलचे न्यूरोसर्जरी विभाग

- Advertisement -

शिवाय, मेंदूमध्ये रक्त जमा होऊन त्यावर ताण येऊ नयेइन्ट्रासेरेब्रल कॉन्ट्युशन तसेच कवटीचे झालेले नुकसान यावर उपचार म्हणून तातडीने क्रॅनिओटॉमी केली गेलीमेंदूची दुखापत गंभीर असल्याने शरीर पूर्वावस्थेत येण्याची प्रक्रिया खूपच धीम्या गतीने होत होती. त्यांना शुद्ध आल्यानंतर घरी सोडण्यात आले.

थ्रीडीप्रिंटेड प्रत्यारोपणामुळे परत मिळाली ओळख

देसाईंचा मेंदू पूर्ववत होण्यासाठी बरेच महिने वेळ दिला गेला.  कवटीचे नुकसान भरून काढत असताना मोठ्या प्रमाणावर इन्ट्राऑपरेटिव्ह मॅनिप्युलेशन न करता शक्य तितके चांगले कॉस्मेसिस करणे डॉक्टर्सच्या टीमसमोरचे मोठे आव्हान होते.  रुग्णाच्या कवटीबरोबरीनेच डोक्याचा पुढचा मोठा भागनाकाचे हाड व डाव्या सुप्राऑर्बिटल रिजलाही दुखापत झालेली होतीया सर्व भागांवर प्रक्रिया केली जाणे आवश्यक होतेत्यामुळे थ्रीडीप्रिंटेड टायटॅनियम प्रत्यारोपणाचा पर्याय निवडण्यात आला कारण त्यामुळे रुग्णाच्या कवटीचा आकार हुबेहूब जुळवता येणे शक्य होते.

- Advertisement -

काय आहे थ्रीडीप्रिंटेड प्रत्यारोपण?

थ्रीडीप्रिंटेड प्रत्यारोपणाचे वेगवेगळे फायदे असतातयामध्ये रुग्णाच्या शरीराचा आकार हुबेहूब जुळवता येतोहे एमआरआय कॉम्पॅटिबल असते आणि संसर्ग होण्याची शक्यता यामध्ये कमी असते.  सिटीस्कॅनमुळे कवटीचे थ्रीडी मॉडेल तयार करण्यात मदत मिळाली.  त्यानंतर टायटॅनियम मेश तयार करण्यात आला जो कवटीला व्यवस्थित फिट बसला.  त्यानंतर थ्रीडीप्रिंटेड टायटॅनियम प्रत्यारोपण निर्माण करण्यात आले आणि प्रत्यारोपण हे रुग्णाच्या आकारानुसार हुबेहूब जुळणारे आहे हे निश्चित झाल्यानंतर न्यूरोसर्जन्सनी क्रॅनिओप्लास्टी केली. त्यानंतर आता देसाई पुन्हा एकदा सामान्य आयुष्य जगत आहेत.


हेही वाचा – देशात पहिली यशस्वी कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

हेही वाचा – ३ फूट सळी घुसली डोक्यात, ६ वर्षांच्या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -