घरदेश-विदेश'ममता बॅनर्जींना पराभवाची जाणीव झाल्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार'

‘ममता बॅनर्जींना पराभवाची जाणीव झाल्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार’

Subscribe

लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव होईल आणि भारतीय जनता पार्टी विजयी होईल हे स्पष्ट दिसू लागल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समर्थकांनी हिंसेचा मार्ग अवलंबला आहे, अशी घणाघाती टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी मुंबईत केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव होईल आणि भारतीय जनता पार्टी विजयी होईल हे स्पष्ट दिसू लागल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समर्थकांनी हिंसेचा मार्ग अवलंबला आहे, अशी घणाघाती टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी मुंबईत केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या पश्चिम बंगाल येथील रोड-शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ बुधवारी भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर तोंडाला काळ्या फिती बांधून निदर्शने करण्यात आली. यावेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, सरचिटणीस (संघटन) विजयराव पुराणिक, ईशान्य मुंबई भाजपा लोकसभा उमेदवार मनोज कोटक, मुख्यालय प्रभारी प्रताप आशर, ज्येष्ठ नेते मुकुंदराव कुलकर्णी, आ. योगेश सागर, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन.सी, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये आणि अतुल शाह यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

काय म्हणाले विनोद तावडे

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आत्तापर्यंत सहा टप्प्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपा देशभरात निवडणूक लढत आहे. देशभरात कुठेही हिंसाचाराची घटना घडली नाही मग पश्चिम बंगालमध्येच हिंसाचाराच्या घटना कशा घडतात. याचे उत्तर ममता दिदींनी द्यायला हवे. देशातल्या अनेक शहरामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे रोड-शो या निवडणुकीच्या काळात झाले. भाजपाला जर हिंसाचार करायचा असता तर इतर ठिकाणीही झाला असता. पण जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या रॅलीमध्ये अशी घटना घडविणे दुर्दैव आहे. ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. त्यांना पराभव स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे त्या हिंसेचा मार्ग अवलंबत आहेत.

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान होत आहे. ममता दिदींना घरी पाठवायचा निर्णय आता बंगाली बाबूंनी घेतला आहे. कारण सत्तेचा माज त्यांच्या डोक्यात गेला आहे. ममता तुम्ही लढवय्या होत्या. मात्र शारदा चिटफंड घोटाळ्यात सगळे बाहेर आले आहे. या लोकशाही देशात अहिंसेचा मार्ग स्विकारला जातो. सर्व निवडणुका शांततेत पार पडत असतात. त्यामुळे जनता तुम्हाला जाब विचारून बाहेर काढेल, असे तावडे यावेळी म्हणाले असून याप्रकरणी भाजपा प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष हैदर अझम आणि प्रदेश युवा मोर्चाचे सरचिटणीस विक्रांत पाटील यांनीही निषेध व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -