घरमुंबईदसऱ्याच्या सकाळीच ठामपा परिवहन सेवेच्या जीसीसी वाहनचालकांचे आंदोलन

दसऱ्याच्या सकाळीच ठामपा परिवहन सेवेच्या जीसीसी वाहनचालकांचे आंदोलन

Subscribe

पगार न झाल्याने या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले. दरम्यान पालिका प्रशासनाच्या वतीने कंत्राटी कामगारांचा वेतनाचा प्रश्न देखील काही अंशी निकालात काढण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ठाणे परिवहन सेवेच्या जीसीसी पद्धतीने परिवहनच्या बसेस चालविणाऱ्या कंत्राटी वाहन चालकांनी दसरा सणानिमित्ताने सकाळीच काम बंद आंदोलन केले. पगार न झाल्याने या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले. दसऱ्यानिमित्ताने सुट्टी असल्याने प्रवाशांना त्रास झाला नाही. असे असले तरी जवळपास १७० बसेस बाहेर न पडल्याने परिवहनचे काही प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान पालिका प्रशासनाच्या वतीने कंत्राटी कामगारांचा वेतनाचा प्रश्न देखील काही अंशी निकालात काढण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सुट्टीचा दिवस असल्याने प्रवाशांना त्रास नाही

ठाणे परिवहनच्या ताफ्यात परिवहन सेवेच्या मालकीच्या बसेसच्या व्यतिरिक्त जीसीसी (कंत्राटी) पद्धतीने चालणाऱ्या बसेसची संख्या ही ५०० पर्यंत आहे. या बसेसवर कंत्राटी पद्धतीने वाहन चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोज परिवहनच्या वागळे, मुल्ला बाग आणि कळवा आगार अशा तीन आगारामधून १९० बसेस बाहेर पडतात. तर सुट्टीच्या दिवशी १९० बसेस बाहेर न काढता १७०च्या आसपास बसेस बाहेर काढल्या जातात. मात्र मंगळवारी सकाळीच दसऱ्याचा सण असतानाही कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्याने कंत्राटी वाहनचालकांनी अचानकपणे काम बंद केल्याने कोणत्याच आगारामधून एकही बस रस्त्यावर धावली नाही. रोज सकाळी ४.३० वाजता आगारातून बाहेर पडणाऱ्या बसेस ९.३० पर्यंत एकही परिवहनची बस रस्त्यावर दिसली नाही. पण सुट्टीचा दिवस असल्याने प्रवाशांना अधिक त्रास झाला नाही.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणार

दसऱ्या निमित्त सुट्टी असल्याने याचा फारसा परिणाम जाणवला नाही. ९.३० वाजता मात्र बसेस सुरळीत रस्त्यावर धावू लागल्या, असे प्रवाशांनी सांगितले. पण प्रशासनाने मात्र बसेस ८.३० वाजताच रस्त्यावर उतरल्या असल्याचा दावा केला आहे. वाहनचालकांनी काम बंद केल्याचे समजताच प्रवाशांची पुढची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने या कामगारांबरोबर त्वरित चर्चा झाली. येत्या दोन दिवसांत यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. वेतनाबरोबरच या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या इतर समस्यासुद्धा आहेत. या सर्व प्रश्नांवर एकत्रित तोडगा काढण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -