घरमुंबईप्रेयसीसोबत पळून जाण्यासाठी पठ्ठ्यानं केलं कोरोना झाल्याचं खोटं नाटक

प्रेयसीसोबत पळून जाण्यासाठी पठ्ठ्यानं केलं कोरोना झाल्याचं खोटं नाटक

Subscribe

पोलिसांच्या चौकशीत त्याने प्रेयसीच्या प्रेमात त्याने पत्नी आणि मुलाला सोडून हा बनाव केल्याची दिली कबुली

‘मला कोरोना झाला आहे, मी आता मरणार आहे’, असे पत्नीला फोनवर सांगून प्रेयसीसोबत २८ वर्षीय तरूण पळून गेला असल्याचे समोर आले आहे. पळून गेलेला तरूण दोन महिन्यांनी मध्यप्रदेश मधील इंदोर येथे प्रेयसीसोबत सापडला आहे. वाशी पोलिसांनी सतत दोन महिने या प्रकरणाचा पाठपुरावा करून या तरूणाला शोधून त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे.

असा घडला प्रकार

वय वर्ष २८ असणाऱ्या मनिष सुनीलचंद्र मिश्रा असे या विवाहात तरूणाचे नाव आहे. मनीष हा विवाहात असून त्याला एक मुलगा देखील आहे. नवी मुंबईतील वाशी येथे पत्नी आणि मुलासह राहणारा मनीषचे एका तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध होते. त्यासाठी त्याला पत्नी आणि मुलाला सोडून प्रेयसीसोबत संसार थाटायचा होता, मात्र पत्नीला आणि मुलाला सोडून कसे जायचे, या विचारात असताना त्याला कल्पना सुचली. आपल्याला कोरोना झाला असल्याचे खोटे नाटक करून जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी देऊन प्रेयसीसोबत जाण्याच्या बेत मनीष याने आखला.

- Advertisement -

जेएनपीटी या ठिकाणी नोकरी करणारा मनीष हा २४ जुलै रोजी सकाळी कामावर निघालो म्हणून घरातून बाहेर पडला. रात्री सडे आठ वाजता त्याने पत्नीला मोबाईलवरून कॉल करून ‘मी आता वाशी येथील एका लॅब जवळ आहे, त्याने त्याची कोरोना चाचणी केली आणि अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, मला कोरोना झाला असून मी आता जगणार नाही असे तो पत्नीला रडून रडून सांगू लागला. पत्नीने त्याला समजवण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने फोन बंद केला. त्यानंतर मनीषचा फोन लागला नाही म्हणून घाबरलेल्या पत्नीने झालेला प्रकार आपल्या भावाला सांगितला, व पतीच्या शोधासाठी तिने पूर्ण वाशी शहर पालथे घेतले, मात्र पती मिळून न आल्याने अखेर वाशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेला प्रकार पोलिसांना सांगितला.

पोलिसांनी हरवल्याची तक्रार दाखल करून मनीषच्या शोध सुरु केला. पोलिसांनी घरापासून त्याच्या कामपर्यंतच सर्व रस्त्यावर त्याचा शोध सुरु केला. तसेच वाशीतील कोरोना चाचणीचे सर्व लॅब तपासले मात्र अशा नावाच्या व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आलीच नसल्याचे पोलिसांना लॅब वाल्यानी सांगितले. पोलिसांनी शोध सुरूच ठेवला असता वाशी सेक्टर १७ येथे मनीषची मोटारसायकल, कामावरची बॅग आणि हेल्मेट मिळून आले. मनीषने आत्महत्या केली असावी या संशयावरून पोलीसानी वाशीच्या खाडीत बोटीमधून त्याचा शोध घेतला. मात्र मनीष कुठेच सापडत नव्हता. पोलिसांनी मनीषचा मोबाईल फोनची माहिती मागवली असता त्यावर त्याने दोन वेळा १०० क्रमांकावर फोन केल्याचे दिसून आले. त्याअनुषंगाने पोलीसानी शोध घेतला.

- Advertisement -

पोलिसांनी वाशीतील सर्व सीसीटीव्ही तपासत असताना तो एका क्रेटा या भाड्याच्या मोटारीत बसून जात असताना दिसून आला. पोलिसांनी मोटारीचा शोध घेत रायगड, कोकण गाठले तेथेही मनीष पत्ता नाही. मात्र त्याचे एका महिलेसोबत विविहबाह्य संबंध असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता मनीष हा आपल्या प्रेयसीसोबत मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथील एका खेड्यात असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली. वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथक इंदोर येथे रवाना झाले आणि तेथील भरकुवा या खेड्यातून मनीषला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या चौकशीत मनीष याने प्रेयसीच्या प्रेमात त्याने पत्नी आणि मुलाला सोडून कायमचे प्रेयसीसोबत राहण्यासाठी हा बनाव केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी मनीषला ताब्यात घेऊन मुंबईत आणून त्याला समज दिली आणि कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.


धक्कदायक! पुण्यात होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तीनं नैराश्यामुळं घेतला गळफास
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -