घरमुंबईचुनाभट्टी बीकेसी उड्डाणपुलाचे काम अजुनही अर्धवट; आजचा कार्यक्रम रद्द

चुनाभट्टी बीकेसी उड्डाणपुलाचे काम अजुनही अर्धवट; आजचा कार्यक्रम रद्द

Subscribe

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते चुनाभट्टी दरम्यानच्या फ्लायओव्हरचे लोकार्पण आज करण्यात येणार होते. मात्र, या उड्डाणपुलाचे काम अजुनही अर्धवट असल्याने आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा चुनाभट्टी ते बीकेसी या उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले असून या उड्डाणपूलाचा आज लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच हा पुल आजपासून वाहतुकीसाठी देखील खुला करण्याचे जाहीर केले होते. मात्र, शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी कार्यकर्त्यांना घेऊन पुलाची पाहणी केली असता संबंधित अधिकार्‍यांनी पुलाचे काही ठिकाणी काम अर्धवट असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करण्याकरता आणखी दोन दिवस मुदत लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी आमदार नवाब मलिक यांना सांगितले. त्यानुसार हा उड्डाणपूल येत्या मंगळवारपर्यंत सुरु करावा, असे आदेश आमदार नवाब मलिक यांनी संबंधित खात्याला दिले आहेत.

- Advertisement -

फ्लायओव्हरचे काम पूर्ण होण्यास ४ वर्षांचा कालावधी

बीकेसी चुनाभट्टी फ्लायओव्हरचे काम पूर्ण करण्यासाठी तब्बल ४ वर्षांचा कालावधी लागला आहे. फ्लायओव्हरच्या औपचारिक उद्घाटनासाठीचा नव्या सरकारच्या स्थापनेच्या मुहुर्तासाठी वाट पाहिली जात आहे हे लक्षात येताच याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नवाब मलिक यांच्या पुढाकाराने आंदोलन करण्यात आले होते. केंद्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही या फ्लायओव्हरच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार अशी चर्चा होती. मात्र, महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता या कार्यक्रमाला कोणतेही राजकीय वळण लागता कामा नये, असा सावध पवित्रा एमएमआरडीएने घेतला असून कोणत्याच औपचारिक कार्यक्रमाशिवाय हे उद्घाटन होणार होते. मात्र, उड्डाणपुलाचे काम अजुनही अर्धवट असल्याने हा लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

- Advertisement -

आता होणार वेळेची बचत होणार

ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ते बीकेसी दरम्यान, जलद कनेक्टिव्हिटीसाठी हा कनेक्टर प्रवाशांचा वेळ वाचवणार आहे. चार पदरी विस्तार असलेल्या या कनेक्टरमुळे सुमारे ३० मिनिटे इतका वेळ वाचवणे वाहन चालकांसाठी शक्य होईल. तसेच या फ्लायओव्हरची लांबी १.६ किलोमीटर तर १७ मीटर रूंदीचा हा फ्लायओव्हर आहे. बीकेसी चुनाभट्टी फ्लायओव्हरशी संबंधित काही कामे शिल्लक होती. त्यामुळे या फ्लायओव्हरचे लोकार्पण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून रखडले होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आंदोलन केल्यानंतर मात्र, या फ्लायओव्हरच्या कामाच्या पुर्ततेला वेग आला होता. त्यांनंतर लिखित स्वरूपात, असे आश्वासन एमएमआरडीकडून देण्यात आले होते.


हेही वाचा – प्रवाशांना उचलून यमराजाच्या पाठीत उसण 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -