घरमुंबईअखेर तिसऱ्या दिवशी दिव्यांशचा शोध थांबवला

अखेर तिसऱ्या दिवशी दिव्यांशचा शोध थांबवला

Subscribe

गोरेगाव येथे उघड्या गटारात पडलेल्या दिव्यांश सिंग या दोन वर्षाच्या मुलाचा तीन दिवसांपासून सुरु असलेला शोध अखेर शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास थांबवण्यात आला आहे.

गोरेगाव येथे उघड्या गटारात पडलेल्या दिव्यांश सिंग या दोन वर्षाच्या मुलाचा तीन दिवसांनंतरही शोध लागलेला नसून पोलीस, पालिका, अग्निशमन दल, एनडीआरएफच्या पथकांची बुधवारी रात्रीपासून सुरू असलेली शोधमोहीम अखेर शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास थांबवण्यात आला आहे. दिव्यांश सापडत नसल्याने स्थानिक नागरिक वारंवार आंदोलनाचा इशारा देत असल्याने शुक्रवारी या ठिकाणी तणावाची स्थिती होती. त्यामुळे पोलिसांनी या आंबेडकरनगर परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता.

गोरेगाव येथील आंबेडकर नगरमधील एका उघड्या गटारात दिव्यांश सिंग पडला होता. बुधवार रात्रीपासून त्याचा शोध सुरु होता. परिसरातील सीसीटीव्हीमध्ये तो गटारात पडताना स्पष्ट दिसत आहे. खेळता खेळता तो बुधवारी रात्री रस्त्यावर आला आणि एका उघड्या गटारात पडला. दरम्यान, पोलीस प्रशासन आणि अग्नीशमन दलाचे जवानांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. गटारापासून जवळ असलेल्या नाल्यामध्ये तो वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, त्याचा तपास लागलेला नाही. अग्नीशमनच्या जवानांनी साधारण दहा किमीपर्यंतच्या ड्रेनेज लाईनची पाहणी केली.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

दिव्यांश सिंग आपल्या आई-वडील आणि दोन भावंडांसह गोरेगाव-मुंबई लिंक रोडवरील इटालियन कंपनीजवळील आंबेडकर चौकातील चाळीत राहत होता. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास तो आपल्या वडिलांच्या पाठोपाठ घरातून बाहेर निघाला. परंतु, ही गोष्ट त्याच्या वडिलांना माहित नाही, चाळीतून बाहेर निघाल्यावर तो वडिलांचा पाठलाग करत असताना उघड्या गटारात पडला. दरम्यान, दिव्यांशच्या आईने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. दिव्यांश मिळत नसल्याने त्याच्या आईने आरडोओरड केली. या आवाजात अजूबाजीचू लोक जमा झाली. त्यानंतर दिव्यांशचा शोध घेण्यासाठी परिसरातील मशिदीबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेट पाहण्यात आले. यावेळी दिव्यांश गटारात पडल्याचे आढळले. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर पालिका कर्मचारी आणि अग्निशमन दल देखील घटानस्थली दाखल झाले. रात्रभर शोध मोहिम सुरु राहिली. मात्र, दिव्यांश सापडला नाही. गुरुवारी दिवसभर आणि रात्री देखील त्याचा शोध सुर आहे. मात्र, तो अध्यापही सापडलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -