शौचालयांची कामे धिम्यागतीने, संबंधित अधिकार्‍यांना महापालिकेची नोटीस

Mumbai
bmc building
मुंबई महानगरपालिका मुख्यालय

मुबईतील अनेक भागांमध्ये शौचालयांच्या बांधकामाला टप्पा ११ अंतर्गत सुरुवात झाली असली तरी अनेक ठिकाणी कंत्राटदारांची नेमणूक करूनही यांच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही. तसेच अनेक ठिकाणी शौचालय ेपाडून नव्याने बांधकाम करण्याची प्रक्रीया राबवली जात नाही. परिणामी स्थानिक रहिवाशांची होणारी गैरसोय आणि त्रास होत असून कंत्राटदारांकडून योग्यप्रकारे काम करून न घेतल्याबद्दल प्रत्येक विभाग कार्यालयांमधील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहायक अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यता आली आहे.

एम/पूर्व विभागात ५०१ शौचकुपांचा वापर ९९ लाख रहिवाशी करत असल्याचे सांगत ९० टक्के शौचालयांना मलवाहिनी जोडलेल्या नाहीत. तसेच ५० टक्के शौचालये ही धोकादायक स्थितीत असून ६५ टक्के शौचालयांमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याचेही सर्वे अहवालातून स्पष्ट झाले. सध्या महापालिकेने टप्पा ११ अंतर्गत शौचालयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. परंतु आजही झोपडपट्टयांप्रमाणे सोसायट्यांमधील शौचालयांमधील मल खुल्या नाल्यांमध्ये सोडला जात आहे. त्यामुळे पुढील बैठकीतील २४ विभाग कार्यालयांमधील शौचालयांच्या कामांचा अहवाल सादर केला जावा,अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केल्यानंतर, समिती अध्यक्षांनी सर्व शौचालयांच्या कामांचा विस्तृत अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

स्थायी समितीत मुंबईतील सर्व शौचालयांच्या बांधकामांबाबत तसेच रखडलेल्या या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाने २४ विभाग कार्यालयांमधील सहायक अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अनेक ठिकाणी शौचालयांची कामे रखडलेली असून काही ठिकाणी बांधकामे तोडल्यानंतर त्याठिकाणी युध्दपातळीवर शौचालये बांधली जात नाही. त्यामुळे कंत्राटदारांकडून शौचालयांची कामे करून घेण्यात अपयशी ठरणार्‍या विभाग कार्यालयांमधील सहायक अभियंत्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात सहआयुक्त अशोक खैरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, अनेक विभागांमध्ये शौचालयांची कामे आवश्यक त्या पध्दतीने जलदगतीने सुरु नाहीत. त्यामुळे याप्रकरणी विभागातील घनकचरा विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here