Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन टॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन : पेडलरच्या सर्च मोहिमेत NCB ला सापडली अभिनेत्री

टॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन : पेडलरच्या सर्च मोहिमेत NCB ला सापडली अभिनेत्री

एनसीबीच्या पेडलरला पकडण्याच्या शोध मोहिमेमध्ये टॉलिवूडची अभिनेत्री सापडली आहे.  एनसीबीने शनिवारी रात्री वांद्रे आणि मिरारोड परिसरात छापेमारी केली. या छापेमारीत टॉलिवूडच्या एका अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन एकामागून एक समोर येत आहे. त्यात आता टॉलिवूडचेही ड्रग्ज कनेक्शन समोर येणार असल्याचे दिसत आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) एका टॉलिवूड अभिनेत्रीला शनिवारी रात्री रंगेहात ड्रग्ज घेताना पकडले आहे. मुंबईच्या मिरारोड येथे एका हॉटेलमध्ये अभिनेत्रीला ड्रग्ज घेताना पकडले आहे. एनसीबीच्या पेडलरला पकडण्याच्या शोध मोहिमेमध्ये टॉलिवूडची अभिनेत्री सापडली आहे.  एनसीबीने शनिवारी रात्री वांद्रे आणि मिरारोड परिसरात छापेमारी केली. या छापेमारीत टॉलिवूडच्या एका अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. एनसीबीने या छापेमारीत सुमारे १० लाख रूपये किंमतीचे ड्रग्ज ताब्यात घेतले आहे. या छापेमारिनंतर आता बॉलिवूडप्रमाणेच टॉलिवूडचेही कनेक्शन असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शनिवारी एनसीबीने केलेल्या छापेमारीत मिरारोड येथील क्राऊन बिझनेस हॉटेलमध्ये छापेमारी केली. यावेळी ड्रग्ज सप्लायर सईद या ड्रग्ज पेडलरला अटक करायला गेले असताना टॉलिवूडची अभिनेत्रीही त्याच्यासोबत असलेली समोर आली. अभिनेत्रीसोबतचा सप्लायर फरार झाला असून अभिनेत्रीला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. या हॉटेलचे संचालक आणि हॉटेस बरेच दिवस एनसीबीच्या रडावर होते. एनसीबीला माहिती कळताच त्यांनी हॉटेलवर छापा मारून ड्रग्ज जप्त केले. या हॉटेल विषयी अधिक माहिती एनसीबी घेत आहे.

- Advertisement -

एनसीबीने शनिवारी वांद्रे येथे केलेल्या छापेमारित चांद मोहम्मद शेख या व्यक्तीलाही अटक केली आहे. त्याच्याकडे ४०० ग्रॅम वजनाचे ड्रग्ज आढळून आले आहे. चांद शेख हा मल्टिनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करतो. मात्र तरीही त्याचे ड्रग्ज कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ गुरूग्राम मार्गावर मोहम्मद चांद शेख याच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले.


हेही वाचा – भाजपाला खुश करून माझ्या हातात फक्त २५ ते ३० कोर्ट केस आल्या – कंगना

- Advertisement -