घरताज्या घडामोडीब्रिटिशकालीन ग्रॅण्ट रोडच्या फ्रेअर पुलावर हातोडा

ब्रिटिशकालीन ग्रॅण्ट रोडच्या फ्रेअर पुलावर हातोडा

Subscribe

पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड ते ग्रॅण्ट रोड या स्थानका दरम्यान, फ्रेअर पुलावर अखेर हातोडा पडणार आहे.

लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपूल बंद केल्यानंतर दक्षिण मुंबईतील आणखी एक महत्त्वाचा उड्डाणपूल बंद होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड ते ग्रॅण्ट रोड या स्थानका दरम्यान, फ्रेअर पुलावर अखेर हातोडा पडणार आहे. हा पूल १६ जानेवारी रोजी पाडण्यात येणार असून नवीन पुलाच्या कामासाठी गर्डर टाकण्यात येणार आहे. तसेच या नवीन पुलाचे काम सहा महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

असा घेण्यात आला निर्णय

आयआयटी मुंबई, महापालिका आणि रेल्वे यांच्या संयुक्त समितीने रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल आणि पादचारी पुलांची मागील वर्षी सप्टेंबरमध्ये फ्रेअर पुलाची पाहाणी केली होती. फ्रेअर पुलाची पाहाणी केल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यानंतर या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करण्याऐवजी नवीन पूल बांधण्याची शिफारस या संयुक्त समितीने केली. तर अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्यासंदर्भात रेल्वे आणि महापालिका प्रशासनाची बैठकही झाली. या बैठकीत ग्रॅण्ड रोड स्थानकावरील मौलाना शौकत अली मार्गावरील फ्रेअर पूल अवजड वाहनांसाठी तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. फ्रेअर पूल १९२१ मध्ये बांधण्यात आला होता. पश्चिम रेल्वे प्रशासनाने आता हा पूल पाडून नवा पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पुलाच्या गर्डरचे आरेखन पश्चिम रेल्वेने केले असून, बांधकामात चांगल्या दर्जाचे गंजरोधक पोलाद वापरण्यात येणार आहे.

- Advertisement -

दृष्टिक्षेपात

  • सध्याच्या पुलाची उंची १६.७८ मीटर
  • नियोजित पुलाची उंची १७.४९ मीटर
  • नवीन पुलावर दोन स्वतंत्र मार्गिका
  • पादचाऱ्यांसाठी दोन्ही बाजूंना स्कॉयवॉक
  • सहा महिन्यांत प्रवाशांच्या सेवेत

    हेही वाचा – उद्योगातील सांडपाणी होणार शुद्ध


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -