९७ कोटींसाठी औषध वितरकांचे १२ नोव्हेंबरला आंदोलन

थकीत बिले लवकरात लवकर मिळावे यासाठी औषध वितरकांकडून १२ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता हाफकिन बायो फार्मासिट्युकलसमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

medicines will now be available 40 discount rate

राज्यातील रुग्णालयांना आवश्यक औषधे, उपकरणे पुरवणार्‍या औषध वितरकांचे राज्य सरकारने थकवलेले तब्बल ९७ कोटी रुपयांची बिले थकवले आहेत. थकीत बिले लवकरात लवकर मिळावे यासाठी औषध वितरकांकडून १२ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता हाफकिन बायो फार्मासिट्युकलसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी मुंबई, ठाणे, कल्याणमधील जवळपास १०० पेक्षा अधिक औषध वितरक उपस्थित राहणार आहेत.

कोरोनामुळे औषध वितरक देशोधडीला लागले आहेत. त्यातच राज्य सरकारने ९७ कोटींची बिले थकवल्याने औषध वितरकांची अवस्था दयनीय झाली आहे. २०१८-१९, २०१९-२० या वर्षासाठी हाफकिनने राज्यातील विविध औषध वितरकांकडून तब्बल २२० कोटींची औषधे खरेदी केली होती. यातील तब्बल ९७ कोटींची बिले अद्यापपर्यंत हाफकिनकडून औषध वितरकांना दिलेली नाही. ही बिले मंजूर व्हावी यासाठी सात ते आठ महिन्यांपासून वितरकांकडून हाफकिनकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. थकीत बिलांसदर्भात चौकशी करण्यासाठी जाणार्‍या वितरकाला हाफकिनमध्ये प्रवेश दिला जात नाही. तसेच हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालकही या प्रकरणी वेळ देत नसल्याने औषध वितरकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. थकित बिले तातडीने बिले मंजूर करण्यात यावी, यासाठी औषध वितरकांकडून १२ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता हाफकिन बायो फार्मासिट्युकलसमोर आंदोलन करण्यात येणार आहे.